शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने मोडले लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:23 PM

पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे.

ओटावा (कॅनडा) - पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे. येथील सुसन नावाच्या तरुणीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न ठरले होते. विवाहासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एखाद्या परिकथेतील विवाह सोहळ्याप्रमाणे हा विवाह सोहळा संपन्न होत होता.  पण हा विवाह फेअरी टेलच्या अंदाजात होऊ शकला नाही कारण विवाहाला आलेल्या पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिला. अखेरीस संतापलेल्या नवरीने हे लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला.  सूसन आणि तिच्या प्रियकराची लहानपणी भेट झाली होती. काही वर्षांनी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 18 व्या वर्षी सुसनचा साखरपुडा झाला होता. तसेच 20 व्या वर्षी ती आई झाली. मात्र तिच्या प्रेमकहाणीचा फेअरी टेलसारखा शेवट होऊ शकला नाही. विवाह मोडल्यानंतर नवरीने फेसबूक पोस्टवरून आपला राग व्यक्त केला असून, तिची फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून सूसनने आलेल्या पाहुण्याची माफी मागितली आहे. मात्र विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांवर तिने ताशेरे ओढले आहेत. "मी तुम्हा सर्वांना फेअरी टेलसारख्या विवाहात निमंत्रित केले होते. तसेच मला आहेरात रोख रक्कम देण्याची मागणी केली होती. आता जर तुम्ही रोख रक्कम दिली नाही तर आमच्या या आलिशान विवाहाचा खर्च कसा पूर्ण होईल?," असा सवाल तिने पाहुण्यांना केला.  या महागड्या विवाहासाठी 60 हजार कॅनेडियन डॉलरची गरज होती. मात्र या विवाहाला मदत करण्यासाठी केवळ 8 जण तयार झाले. आपल्या आधीच्या कुटुंबीयांनी पाच हजार डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतर त्यांनीही नकार दिला. त्यानंतर आणखी काही जणांनी मदत करण्याचा नाकारले. त्यामुळे दु:खी झालेल्या सुसनने अखेरीस विवाह मोडण्याचे ठरवले.  

टॅग्स :marriageलग्नCanadaकॅनडाnewsबातम्या