शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे 'हॉट', तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:03 IST

महिलेने शेताला आग का लावली याचं कारण समजल्यावर नक्कीच धक्का बसेल.

ग्रीसमध्ये एका महिलेला दोनदा शेताला आग लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने शेताला आग का लावली याचं कारण समजल्यावर नक्कीच धक्का बसेल. महिलेला अग्निशमन दलाचे कर्मचारी खूप चांगले, हँडसम आणि हॉट वाटायचे. तिला त्यांच्यासोबत काम करायला आणि फ्लर्ट करायला भरपूर आवडायचं. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने दोनदा शेताला आग लावली आहे. 

त्रिपोली पोलिसांनी महिलेच्या अटकेबाबत माहिती दिली आहे. अर्काडियातील त्रिपोली नगरपालिकेच्या केरासिट्सा परिसरात दोनदा जाणीवपूर्वक शेतजमिनीला आग लावण्यास ही महिला जबाबदार आहे असं म्हटलं आहे. महिलेने असं केलं कारण तिला अग्निशमन दलाचे कर्मचारी पाहण्यात आणि त्यांच्यासोबत फ्लर्टिंग करण्यात मजा येत होती. 

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या दोन्ही ठिकाणी ही महिला दिसली, ज्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झाला. अखेर अधिक तपास केल्यानंतर सत्य समोर आलं. असा प्रकार कोण करणार या विचाराने पोलीसही हैराण झाले होते.

डेलीमेलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, ग्रीसमधील एका ४४ वर्षीय महिलेने दोनदा शेतीला आग लावली कारण तिला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाहणं आणि त्यांच्यासोबत फ्लर्ट करणं आवडायचं. महिलेला आता तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे. या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.  

टॅग्स :fireआग