शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

Astrazeneca Vaccine: भारतीयांसाठी दिलासादायक! 'कोव्हिशिल्ड' ब्रिटनमध्ये जबरदस्त प्रभावी ठरली; 80 टक्के मृत्यू घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 9:43 AM

Astrazeneca Vaccine Update, Covishield: ब्रिटनमध्ये जगातील सर्वाधिक प्रमाणावर वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले आहे. ऑक्‍सफर्ड- एस्ट्राझिनेकाच्या (AstraZeneca's Vaccine) लसीचा पहिला डोस घेणाऱ्य़ा लोकांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

कोरोना महामारीच्या (Corona Virus) पहिल्या वर्षातच जगभरातील विविध कंपन्यांना लस बनविण्यात यश आले आहे. कोणत्या कंपनीची कोणती लस प्रभावी यावर मतमतांतरे आहेत. चीनसारख्या देशांच्या काही लसी फेल ठरल्याच्या बातम्याही आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामध्ये ब्रिटनमधून (Britain) भारतीयांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी येत आहे. (AstraZeneca's COVID-19 vaccine shows one dose of the shot results in 80% less risk of death from the disease, Public Health England said on Monday.)

Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय

ब्रिटनमध्ये जगातील सर्वाधिक प्रमाणावर वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले आहे. ऑक्‍सफर्ड- एस्ट्राझिनेकाच्या (AstraZeneca's Vaccine) लसीचा पहिला डोस घेणाऱ्य़ा लोकांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेल्यांच्या मृत्यूमध्ये 80 टक्के घट झाली आहे. ही तीच लस आहे ज्या लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु झाले आहे. तसेच ही लस भारतात कोव्हिशिल्ड (covishield) म्हणून ओळखली जाते. 

Covishield लसीचे काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या अभ्यासात समोर आले सत्य

पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या संशोधनानुसार अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यास कोरोनामुळे मृत्यूचा धोका हा 80 टक्क्यांनी कमी होतो. तर अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस घेतल्य़ास दोन डोसनंतर मृत्यूचा धोका हा 97 टक्क्यांनी कामी होतो. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी या आकड्यांची प्रशंसा केली आहे. हे आकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत की, लस कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी खूप प्रभावी आहे. 

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार आतापर्यंत देशात जेवढे लसीकरण झालेय त्यातून 10000 लोकांचे जीव वाचविता आले आहेत. ब्रिटनची लोकसंख्या ही 1 कोटी 80 लाख आहे. यापैकी तीन वयस्कर व्यक्तींमागे एकाला कोरोना लस टोचण्यात आली आहे. यामुळे ब्रिटनेमध्ये कोरोना संक्रमण, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन आणि मृतांचा आकडा खूप कमी झाला आहे.  यामुळे आता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सरकार नागरिकांना कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाच केले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंड