Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:55 AM2021-05-11T08:55:13+5:302021-05-11T09:15:12+5:30

Pfizer-BioNTech Corona vaccine for 12-15 year olds : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कंपन्यांनी ही लस मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. लस घेतल्यानंतर कोणतेही 'साइड इफेक्ट' देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटले होते.

Corona vaccination: Pfizer-BioNTech vaccine allowed for 12-15 year olds; US FDA decision | Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय

Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय

Next

कोरोना महामारीच्या (Corona Virus) विरोधात सुरु असलेल्या लढ्याला अमेरिकेमधून मोठी दिलासादायक बातमी येत आहे. फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला (Corona Vaccine) मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस किशोरवयीनांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत या वयोगटासाठी लसीकरण सुरु होऊ शकते. (US Food and Drug Administration (FDA) on Monday authorized the use of the Pfizer-BioNTech Covid-19 vaccine on children aged 12 to 15 years old.)


मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कंपन्यांनी ही लस मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. लस घेतल्यानंतर कोणतेही 'साइड इफेक्ट' देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटले होते. या लसीला साधारण दीड महिन्यांनी अमेरिकेने परवानगी दिली आहे. एफडीएचे कार्यवाहक आय़ुक्त जेनेट वुडकॉक यांनी या पावलाला कोरोना महामारीविरोधातील महत्वाचा टप्पा म्हटले आहे. 


या लसाबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही मुलांच्या पालकांना हे आश्वासन देऊ इच्छितो की, एफडीएने सर्व उपलब्ध आकड्यांचा सखोल अभ्यास केला आहे. महत्वाचे म्हणजे एफडीएने आधी 16 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी दिली होती. 
मीडिया रिपोर्टनुसार भारतात कॅडिला (Cadila Healthcare Ltd) ही कंपनी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या लसीसाठी काम करत आहे.

अहमदाबादच्या या कंपनीने मुलांच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही केली आहे. यामुळे या लसीला मंजुरी मिळाली तर भारतात लसीकरणासाठी वापर केली जाणारी ही चौखी कोरोना लस असणार आहे. सध्या सीरमची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पतनिक व्हीचा वापर सुरु झाला आहे. परंतू हा वापर 18 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरु झाला आहे. मुलांसाठी लस आल्यास तो एक मोठा लढा ठरणार आहे. 

भारतीय वंशाचा अभिनव देखील चाचणीत सहभागी
फायजरच्या लशीची चाचणी ऑक्टोबर २०२० पासून सुरु करण्यात आली. याचे परिणाम आता समोर येत आहेत. भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिनव यानंही फायजर लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता. अभिनव याचे वडील डॉक्टर असून तेही या लशीच्या चाचणीत सहभागी झाले होते. अभिनव यानं अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पीटलमध्ये फायजर लशीचा डोस घेतला होता. 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccination: Pfizer-BioNTech vaccine allowed for 12-15 year olds; US FDA decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app