शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर; भारत सरकार म्हणतं 'नो टेन्शन'!

By मोरेश्वर येरम | Published: December 21, 2020 2:59 PM

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघाबरण्याचं कारण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची ग्वाहीब्रिटनमधील कोरोनाच्या परिस्थितीवर भारत सरकारचं पूर्ण लक्षब्रिटनमध्ये पुन्हा करण्यात आला कडक लॉकडाउन

नवी दिल्लीकोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराने (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये खळबळ माजवलेली असताना आता भारतातही याबाबतची अधिक काळजी घेण्याच्या माणगीने जोर धरला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता युरोपमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. 

दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी करण्यात आला असून घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराने खळबळ उडाली. नवा व्हायरस आधीच्या व्हायरसपेक्षा ७० टक्क्यांनी अधिक वेगाने पसरत असल्याचं लक्षात आलं आहे. युरोपमधील या परिस्थितीमुळे संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरातून १५ हून अधिक देशांनी विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. पण भारताने मात्र याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. 

केंद्र सरकार म्हणतं घाबरण्याचं कारण नाहीकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन नव्या व्हायरसला घाबरुन जाण्याचं काही कारण नसल्याचं म्हटलं आहे. "केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षभरात सरकारने आवश्यक सर्व निर्णय घेतल्याचं तुम्ही पाहिलं आहे. काय करावं? आणि काय करु नये? याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. माझ्या मते देशातील जनतेने घाबरण्याचं कोणतही कारण नाही", असं हर्षवर्धन म्हणाले. 

कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बैठकीचं आयोजन केलं आहे. आरोग्य सेवेचे महासंचालक या बैठकीचं नेतृत्व करणार आहेत. तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रतिनिधी बैठकीला उपस्थित असणार आहेत. 

ब्रिटनमध्ये हाहा:कारकॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यBJPभाजपा