शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा पाकिस्तानात सरकारी पाहुणचार, भारताचा परखड आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 03:58 IST

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे महावीर सिंघवी यांनी गुरुवारी दहशतवादी विरोधी डिजिटल सप्ताहादरम्यान वेबिनारमध्ये ही टिप्पणी केली.

संयुक्त राष्ट्रे : मुंबईत १९९६ मधील साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबत ठोस पुरावे देऊनही कारवाई न केल्याने भारतानेपाकिस्तानवर परखड टीका केली. भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर संयुक्त राष्टÑाने बंदी घातलेली असली तरी हे दोषी मात्र पाकिस्तानात सरकारी पाहुणचाराचा आनंद घेत आहेत, याकडे भारताने जगाचे लक्ष वेधले आहे.भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे महावीर सिंघवी यांनी गुरुवारी दहशतवादी विरोधी डिजिटल सप्ताहादरम्यान वेबिनारमध्ये ही टिप्पणी केली.मानवी हक्कांचे रक्षण करणे अािण ते शाबूत राखण्यासाठी सामूहिक निर्धाराचा पुनरुच्चार करण्याची ही वेळ आहे. दुर्दैवाने सीमापार दहशतवादाचा प्रायोजक असलेल्या पाकिस्तानने मात्र खोडसाळपणा करीत भारताविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे.जम्मू-काश्मिरचा भारताचा अंतर्गत भाग असून भारताचाच कायम राहिल, असा पुनरुच्चार करतांना सिंघवी वेबिनारमध्ये म्हणाले की, पाकिस्तानने जम्मू-काश्मिरची अभिलाषा बाळगणे सोडून द्यावी.हा तर निव्वळ ढोंगीपणामानवी हक्क आणि समानतावादाचे प्रवर्तक असल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निव्वळ ढोंग आहे. कारण पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांसह सिंध आणि बलुचिस्तानवासीयांवर अत्याचार होत आहे, असा परखड आरोपही सिंघवी यांनी केला.पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या विविध व्यासपीठांवरून जम्मू-काश्मीरसह भारतातील अंतर्गत मुद्दे उपस्थित करण्याचा खटाटोप सातत्याने करीत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारताने दहशतवादविरोधी व्यासपीठावरून भारताचे देशांतर्गत धोरण आणि अंतर्गत मुद्दे उपस्थित केल्यावरून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला होता.दहशतवादाला सातत्याने रसदविदेश मंत्रालयातील दहशतवादविरोधी विभागाचे सहसचिव असलेले सिंघवी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान सीमापार दहशतवादासाठी लष्करी, वित्तीय आणि रसदपुरवठा सातत्याने करीत आहे; परंतु १९९३ मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ मधील मुंबईतील भयानक दहशतवादी हल्ल्यासह भारतात करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबत ठोस पुरावे देऊनही कारवाई न करता पाकिस्तानने दहशतवादपीडितांना मूलभूत हक्कांपासून वंचित केले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ