इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:31 IST2026-03-30T12:31:06+5:302026-03-30T12:31:29+5:30

Diesel Price Hike 81 Percent : अमेरिका-इराण युद्धाचा पाचवा आठवडा! फिलिपिन्समध्ये डिझेल ८१.६% तर नायजीरियात ७८% महागले. जागतिक इंधन टंचाई आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा सविस्तर अहवाल वाचा.

Global fuel price hike! Diesel prices rise by 81 percent due to US-Iran war; 'These' countries hit hardest | इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका

इंधन दरवाढीचा जागतिक भडका! अमेरिका-इराण युद्धामुळे डिझेल ८१ टक्क्यांनी महागले; 'या' देशांना बसला सर्वात मोठा फटका

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, इंधन संकटाने भीषण रूप धारण केले आहे. या युद्धाचा सर्वाधिक परिणाम डिझेलच्या किमतींवर झाला असून, काही देशांमध्ये डिझेलचे दर तब्बल ८१ टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर महागाईचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

फिलिपिन्समध्ये डिझेलच्या किमतीत जगात सर्वाधिक म्हणजे ८१.६% वाढ झाली आहे. यापाठोपाठ नायजेरियामध्ये ७८.३%, मलेशियामध्ये ५७.९%, आणि सिंगापूरमध्ये ४४% दरवाढ नोंदवण्यात आली आहे. विकसित देशांनाही याचा फटका बसला असून, अमेरिकेत ४१.२% आणि जर्मनीमध्ये ३०.९% ने डिझेल महागले आहे. कच्चे तेल ११६ डॉलरवर गेले आहे. 

भारताची स्थिती काय?
जगातील अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, भारताने मात्र आतापर्यंत आपल्या किरकोळ इंधन दरांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. रशियाकडून होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा आणि सरकारच्या धोरणांमुळे भारतात डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली नाही. मात्र, औद्योगिक डिझेलच्या दरात प्रति लिटर २२ रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे संकेत मिळत आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनीचा अडथळा
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला असून, तज्ज्ञांच्या मते युद्ध न थांबल्यास हा दर १५० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. तसे झाल्यास जगाला भीषण आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असा इशारा 'ब्लॅकरॉक'च्या सीईओनी दिला आहे.

युद्धाचा इंधनावर असा झाला परिणाम
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या पहिल्या स्ट्राईकनंतर हे युद्ध पेटले. इराणने त्याला मिसाईल हल्ल्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे आणि तेल टँकर्सवर झालेले हल्ले यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्च्या तेलाची शुद्धीकरण प्रक्रिया खर्चिक झाल्याने पेट्रोल आणि विशेषतः डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

Web Title : ईंधन की कीमतों में वैश्विक उछाल: अमेरिका-ईरान संघर्ष से डीजल महंगा

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव से वैश्विक ईंधन संकट, कुछ देशों में डीजल की कीमतें 81% तक बढ़ीं। फिलीपींस, नाइजीरिया सबसे अधिक प्रभावित। रूसी तेल और सरकारी नीतियों के कारण भारत अपेक्षाकृत स्थिर, लेकिन औद्योगिक डीजल की लागत बढ़ रही है। संघर्ष बढ़ने पर आर्थिक मंदी का खतरा।

Web Title : Global Fuel Price Surge: US-Iran Conflict Drives Diesel Costs Up

Web Summary : US-Iran tensions ignite global fuel crisis, diesel prices soar up to 81% in some nations. Philippines, Nigeria hit hardest. India relatively stable due to Russian oil and government policies, but industrial diesel costs are rising. Economic recession looms if conflict escalates.