शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील फोटो प्रकरणी प्रेयसी ॲश्ले सेंट क्लेयरने इलॉन मस्कला खेचलं कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:44 IST

ॲश्ले सेंट क्लेयर ही मस्क यांच्या मुलांपैकी एकाची आई आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी/गर्लफ्रेंड.

इलॉन मस्क यांना कोण ओळखत नाही? जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांपैकी ते एक आहेत, यात आता तसे काही विशेष अप्रूप राहिलेले नाही; पण कोणत्या ना कोणत्या वादाने ते कायम चर्चेत असतात आणि लोकही हे वाद आवडीनं चघळतात. हे वाचल्यावर तुम्ही विचारालच, आता कुठल्या नव्या वादात ते अडकलेत? - बरोबर आहे. आता आणखी एका नव्या वादामुळे जगभरात त्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. इलॉन मस्क आणि त्यांची प्रेम प्रकरणे, त्यांची औरस आणि अनौरस मुले यासंदर्भातही आजवर खुपदा चर्चा झाली आहे. आताचा वादही मस्क यांच्या मुलाच्या आईच्या म्हणजेच त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडच्या निमित्ताने सुरू झाला आहे; पण विषय मात्र एकदम नवा आहे. 

ॲश्ले सेंट क्लेयर ही मस्क यांच्या मुलांपैकी एकाची आई आणि त्यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी/ गर्लफ्रेंड. ॲश्लेने मस्क यांच्या मालकीच्या ग्रोक या चॅटबॉटवर न्यायालयात नुकतीच केस ठोकली आहे. बिकिनी घातलेला तिचा आक्षेपार्ह फोटो ग्रोक या चॅटबॉटने तयार केला. तो व्हायरल झाला आणि त्यामुळे आपली बदनामी झाली म्हणून ॲश्लेने ग्रोकच्या म्हणजेच मस्क यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. 

मार्च २०२३ मध्ये इलॉन मस्क यांनी xAI ही कंपनी स्थापन केली. ग्रोक हा एआय चॅटबॉट xAI या कंपनीने विकसित केला आहे. ग्रोकने तयार केलेल्या फोटोमध्ये ॲश्ले जेव्हा १४ वर्षांची होती, तेव्हाच्या एका जुन्या फोटोमध्ये बदल करून तिला बिकिनी घातलेली दाखवण्यात आले आहे. ग्रोकने युजर्सना तिचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो तयार करण्याची परवानगी दिली, त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास आणि बदनामी सहन करावी लागली, असा ॲश्लेचा आरोप आहे. लेखिका आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट असलेल्या २७ वर्षांच्या ॲश्ले सेंट क्लेयरने याविरुद्ध न्यूयॉर्कच्या स्टेट सुप्रीम कोर्टात नुकताच दावा दाखल केला आहे.

मस्क मात्र यावर गप्प बसले नाहीत. त्यांनी  xAI कंपनीच्या वतीने न्यायालयात काउंटर केस दाखल करताना उलट ॲश्लेनेच आपल्या युजर ॲग्रीमेंटचे उल्लंघन केल्याचा दावा करताना तिच्याकडून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीविरोधात केस फक्त टेक्सासच्या फेडरल कोर्टातच दाखल करता येते.

ॲश्लेचे म्हणणे आहे, या डीपफेक फोटोंबद्दल तिने मागच्या वर्षीच ‘एक्स’कडे तक्रार करून फोटो हटवण्याची मागणी केली होती. ‘एक्स’ने तिच्या संमतीशिवाय तिच्या फोटोचा वापर किंवा एडिटिंग केले जाणार नाही, अशी खात्री दिली. मात्र, ॲश्लेचा दावा आहे की तिने तक्रार केली, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला म्हणून उलट सूडभावनेतून तिला आणखी त्रास देण्यात आला.  

ॲश्ले म्हणते, माझे प्रीमियम ‘एक्स’ सब्सक्रिप्शन आणि व्हेरिफिकेशन चेकमार्क काढून टाकण्यात आले. माझे सुमारे १० लाख फॉलोअर्स असले तरी माझ्या  अकाउंटचे ‘मॉनेटायझेशन’ बंद करण्यात आले. म्हणजेच तिच्या अकाउंटच्या माध्यमातून तिला जे पैसे मिळत होते, जी कमाई होत होती ती थांबवण्यात आली. तिला त्यातून काहीच पैसे मिळणार नाहीत, याची ‘व्यवस्था’ करण्यात आली. एवढेच नाही, तिचे जे अपमानास्पद बनावट फोटो ‘एक्स’वर होते, तेही तसेच राहू दिले गेले!

English
हिंदी सारांश
Web Title : Ashley St. Clair Sues Elon Musk Over Deepfake Photos

Web Summary : Ashley St. Clair is suing Elon Musk's Grok chatbot over deepfake photos. She alleges the AI created and spread a manipulated image of her, causing defamation. Musk countersued, claiming breach of user agreement.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीelon muskएलन रीव्ह मस्क