Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:13 IST2025-10-15T17:08:28+5:302025-10-15T17:13:35+5:30
Wim Van Den Heever Photography: तुम्ही जो फोटो बघत आहात, तो काढणाऱ्या छायाचित्रकाराला फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. हा फोटो काढण्यासाठी त्याला तब्बल दहा वर्षे लागली.

Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
Wim Van Den Heever Ghost Town Visitor Photo: एक करड्या रंगाचा दुर्मिळ आढळून येणारा एक लांडगा. एका भग्न अवशेष असलेल्या वस्तीत उभा आहे. निर्मनुष्य असलेले दुमजली घर आहे. आजूबाजूला दगड पडले आहेत. घरावर मंद प्रकाश... एखाद्या हॉरर सिनेमातील दृश्य वाटावं असे हे छायाचित्र. पण, हा क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकाराला तब्बल दहा वर्षे लागली. या वन्यजीव छायाचित्रकाराचे नाव आहे, विम वॅन डेन हीवर... आणि या फोटोचं नाव आहे घोस्ट टाऊन व्हिजिटर. याच फोटोसाठी विम वॅन डेन हीवर यांना वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे.
छायाचित्रकार विम वॅन डेन हीवर यांनी हा फोटो टिपण्यासाठी बरेच प्रयत्न केले. हा फोटो हवा तसा क्लिक करता यावा म्हणून त्यांनी अटलांटिक महासागरावरूनर येणाऱ्या गडद धुक्यामध्ये त्यांनी कॅमेरा लावून ठेवला होता. हीवर म्हणाले, 'मला या करड्या रंगाच्या लांडग्याचा हा फोटो काढण्यासाठी तब्बल दहा वर्षे लागली आहेत.'
फोटोमध्ये दिसणाऱ्या लांडग्याची ही प्रजाती रात्रीच्या वेळीच बाहेर पडते. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना एकट राहायलाच आवडते. नामिबियामध्ये या प्रजातीला कोल्मन्सकॉप नावाने ओळखली जाते. हीवर यांना लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये हा पुरस्कार दिला गेला. याच म्युझियमध्ये हा फोटो १७ ऑक्टोबरपासून १२ जुलैपर्यंत बघण्यासाठी ठेवली जाणार आहे.
इटलीच्या आंद्रेआ डोमिनिजी या छायाचित्रकाराला तरुण वन्यजीव छायाचित्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या आफ्टर द डिस्ट्रक्शन या फोटोसाठी त्याला हा सन्मान दिला गेला. डोमिनिजी हा इटलीतील लेपिनी डोंगरांमध्ये तेव्हा त्याने एका कापलेल्या झाडाच्या खोडावर आराम करत असलेल्या भुंग्याला कैद केले. याच छायाचित्रात एक झाडे कापणारी मशीनही उभी आहे.