"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:07 IST2025-10-07T10:07:01+5:302025-10-07T10:07:36+5:30
याआधीही भारताने पाकिस्तानला उघडं पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात वारंवार अपमानित व्हावे लागते. भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरही पाकिस्तानचे काळे सत्य जगासमोर आणले आहे.

"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
पाकिस्तानला पुन्हा एकदा जगासमोर शरमेने मान खाली घालावी लागली आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला आरसा दाखवला. पाकिस्तान असा देश आहे ज्यांनी १९७१ साली ऑपरेशन सर्चलाइट चालवले आणि आपल्याच सैन्याकडून ४ लाख महिलांचे लैंगिक शोषण केले असा पलटवार भारताने केला आहे. दहशतवादी मुद्द्यावरूनही भारताने पाकिस्तानला घेरले. भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरिश यांनी जम्मू काश्मीर मुद्द्यावर भारताची बाजू संयुक्त राष्ट्रात मांडली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताविरोधात सातत्याने पाकिस्तान विधाने करत होता. पाकने भारतावर खोटे आरोप केले. त्यालाच प्रत्युत्तर देत भारताने हरिश यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला. काश्मीरी महिलांवर कित्येक दशकांपासून लैंगिक अत्याचार होत आहेत असा आरोप पाकने केला होता. त्यावर भारताने पलटवार केला. दुर्दैवाने प्रत्येक वर्षी आमच्या देशाविरोधात चुकीचे आणि भ्रम पसरवणारे भाषण ऐकण्यासाठी आम्ही मजबूर आहोत. विशेषत: जम्मू काश्मीरवर जो भारताचा अविभाज्य घटक आहे त्यावर पाकने कब्जा केला आहे हे ते सांगत नाहीत असं भारताने म्हटलं.
पाकिस्तान असा देश आहे, जो आपल्याच देशातील जनतेवर बॉम्ब फेकतात आणि नरसंहार करतात. तो केवळ जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी खोटे नाटे आरोप करत असतो. १९७१ मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाइट चालवले होते. त्यात त्यांच्या सैन्याने ४ लाख महिलांचे लैंगिक शोषण केले असं भारताने म्हटलं. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही भारताने पाकिस्तानला उघडं पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात वारंवार अपमानित व्हावे लागते. भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरही पाकिस्तानचे काळे सत्य जगासमोर आणले आहे.
📢 India’s envoy to UN DESTROYS Pakistan: "A country that BOMBS its own people & conducts Systematic Genocide can only distract the world with misdirection and hyperbole."🔥
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) October 7, 2025
~ One-liner that left Pakistan speechless. India ate and left no crumbs.
pic.twitter.com/imn59AfG74
दरम्यान, संयुक्त राष्ट्रात महिलांवर चर्चा सुरू होती. ज्यावर पाकिस्तानने भारतावर खोटे आरोप लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु भारताने पाकिस्तानचा चेहरा उघड केला. महिला, शांतता आणि सुरक्षा या अजेंड्यावर भारताने भाष्य केले. शांतता सैन्यात महिला सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे नेतृत्व पोलीस सेवेतील पहिल्या महिला अधिकारी किरण बेदी यांनी केले होते. २००३ साली पहिल्या महिला पोलीस सल्लागार आणि संयुक्त राष्ट्रात पोलीस विभागात प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते असंही भारताने सांगितले.