शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:47 IST

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी रोखण्यात आली होती.

 New York Police Stopped French President Convoy:  अमेरिकेत वाहतूक कोंडीमुळे एक विचित्र राजनैतिक घटना घडली ज्याची जगभरात चर्चा होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची कार पोलिसांनी रोखली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा जात असल्याने पोलिसांनी मॅक्रॉन यांची वाट अडवली होती. त्यानंतर मॅक्रॉन रस्त्यावर उतरले आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलू लागले. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंगळवारी २३ सप्टेंबर अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची गाडी थांबवल्याने गोंधळ उडाला होता. मॅक्रॉन यांनी लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे फोनवरून तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण दिल्यानंतर, मॅक्रॉन दिवसभराचे काम संपवून फ्रान्सच्या दूतावासात परतत असताना, ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा केल्याने न्यू यॉर्क पोलिसांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अडवून ठेवलं होतं. ट्रम्प यांच्या ताफ्यामुळे सर्व रस्ते बंद झाले, ज्यामुळे मॅक्रॉन काही काळासाठी न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर अडकले होते. पोलिसांच्या या कृतीमुळे मॅक्रॉन यांना दूतावासापर्यंत चालत जावे लागले. 

ट्रॅफिकमध्ये अडकल्याने निराश होऊन मॅक्रॉन आपल्या गाडीतून उतरले आणि पोलिसांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने मॅक्रॉन यांना, "माफ करा सक, सर्व काही बंद आहे," असं म्हटलं. जेव्हा पोलिसांनी त्यांना ट्रम्प यांचा गाडी येणार आहे सांगितले तेव्हा रस्त्यावर उभे राहून मॅक्रॉन यांनी विनोदाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना फोन केला. न्यू यॉर्कमध्ये एका बॅरिकेडजवळ गर्दीसमोर उभे राहून मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना मार्ग मोकळा करण्यास सांगितले. "तुम्ही कसे आहात? तुम्हाला माहिती आहे का काय झाले? मी रस्त्यावर उभा आहे कारण तुमच्यासाठी सर्व काही बंद आहे," असं मॅक्रॉन ट्रम्प यांना म्हणाले.

अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. या संभाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना रस्ता तात्काळ मोकळा करण्यास सांगितले. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेल्या मोठ्या घोषणेपूर्वी ही घटना घडली.

टॅग्स :Franceफ्रान्सAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प