पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:19 IST2025-05-14T16:19:19+5:302025-05-14T16:19:42+5:30
लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आणखी जास्त अधिकार मिळाले आहेत,यामुळे आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकांचे टेन्शन वाढले आहे.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. सीमेवर गोळीबारही झाले. दरम्यान, आता दोन्ही देशात 'युद्धविराम'ची घोषणा झाली. दोन्ही देशातील परिस्थितीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान लक्ष ठेवून आहेत. खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांना भेटण्यासाठी त्यांची बहिणी तुरुंगात गेल्या होत्या. त्यांनी भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या.
इम्रान खान यांनी भारत पुन्हा हल्ला करु शकतो अशी भीती व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या बहिणीने दिली. युद्धविराम स्वीकारली असली तरी हल्ला होऊ शकतो. इम्रान खानची बहीण अलिमा खान म्हणाल्या, भारत अजूनही हल्ला करू शकतो याची इम्रान खान यांना काळजी आहे. त्यांनी पाकिस्तानी सैन्य आणि सरकारला सतर्क राहण्यास सांगितले आहे. तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांच्या बहिणींना ८ आठवड्यांनंतर भेटण्याची परवानगी दिली होती.
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
मिळालेल्या माहितीनुसार, अलिमा यांनी इम्रान खान यांना भेटल्यानंतर माध्यमांना सांगितले की, 'त्यांनी सांगितले की भारताकडून अजूनही हल्ला होऊ शकतो. इम्रान खान मला म्हणाले नरेंद्र मोदी पाकिस्तानचा द्वेष करतात आणि रागाच्या भरात पुन्हा हल्ला करू शकतात. ६०% युद्ध मानसिक असते. मला भीती आहे की नरेंद्र मोदी पुन्हा हल्ला करू शकतात. अलिमा म्हणाल्या की, इम्रान खान यांना देशाची चिंता आहे.
इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात
माजी पंतप्रधान इम्रान खान ९ मे २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि त्यांच्या समर्थकांनी लष्करी कार्यालयांवरही हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांविरुद्ध लष्करी न्यायालयात खटले सुरू आहेत. इम्रान खान यांनी समर्थकांनी या बाबींविरुद्ध रस्त्यावर उतरून निषेध करावा असं सांगितलं आहे.