देव तारी त्याला कोण मारी! ३३० फूट दूर फेकली गेली, सीट बेल्ट...; अटेंडंटसोबत घडला 'चमत्कार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 10:40 IST2026-03-24T10:39:03+5:302026-03-24T10:40:07+5:30

न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळावर रविवारी मध्यरात्री झालेल्या विमान अपघातात एक अशी घटना घडली आहे, जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.

flight attendant falls 330 feet from air canada plane despite wearing seat belt after crash | देव तारी त्याला कोण मारी! ३३० फूट दूर फेकली गेली, सीट बेल्ट...; अटेंडंटसोबत घडला 'चमत्कार'

फोटो - ndtv.in

न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळावर रविवारी मध्यरात्री झालेल्या विमान अपघातात एक अशी घटना घडली आहे, जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. एअर कॅनडाची एक फ्लाईट अटेंडंट विमानापासून तब्बल ३३० फूट दूर जाऊन पडली. या भीषण अपघातातून तिचा जीव वाचला आहे. तिला गंभीर दुखापत झाली आहे.

मुलगी 'सारा लेपिन' हिने कॅनेडियन न्यूज चॅनेल 'टीव्हीए नौवेल्स'ला ही माहिती दिली. तिने सांगितलं की, इतक्या दूर फेकल्या गेल्यामुळे मुख्य फ्लाईट अटेंडंट 'सोलांगे ट्रेम्बले' यांच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यांच्यावर आता सर्जरी करावी लागणार आहे. सोलांगे यांची मुलगी लेपिनने सांगितलं की, अपघातानंतर जेव्हा बचाव पथक तिच्या आईजवळ पोहोचलं, तेव्हा त्या सीट बेल्ट लावलेल्या अवस्थेत होत्या. 

विमान अपघाताची भीषणता पाहता त्यांचा जीव वाचणं हा एक चमत्कारच मानला जात आहे. लेपिन म्हणाली की, "हे सर्व नक्की कसं घडलं हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की, एखादा देवदूतच त्यांच्या रक्षणासाठी तिथे असावा." मॉन्ट्रियलहून ७२ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स घेऊन येणारे 'एअर कॅनडा एक्सप्रेस'चे 'सीआऱजे-९००' (CRJ-900) विमान लागुआर्डिया विमानतळावर उतरत असताना एका 'फायर ट्रक'ला धडकलं. या अपघातात पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

विमानातील एका 'विचित्र वासामुळे' रद्द झालेल्या दुसऱ्या एका विमानाची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ट्रकला रनवे पार करण्याची परवानगी देण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा ट्रक रनवे पार करत असतानाच विमान त्याला धडकलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा थरारक क्षण कैद झाला आहे, ज्यामध्ये विमानाची धडक बसल्यानंतर दोन्ही वाहनं वेगाने रनवेवर उलटताना दिसत आहेत.

Web Title : चमत्कार! विमान दुर्घटना में 330 फीट दूर गिरी फ्लाइट अटेंडेंट बची!

Web Summary : न्यूयॉर्क में विमान दुर्घटना के दौरान, एक फ्लाइट अटेंडेंट 330 फीट दूर जा गिरी, फिर भी बच गई। गंभीर चोटों के बावजूद, उसका बचना चमत्कार माना जा रहा है। आग लगने वाले ट्रक से टक्कर के कारण दुर्घटना हुई, जिसमें पायलट और को-पायलट की मौत हो गई।

Web Title : Miracle: Flight attendant survives 330ft fall after plane crash!

Web Summary : During a New York plane crash, a flight attendant was ejected 330 feet but survived. Despite serious injuries, including a fractured leg, her survival is considered miraculous. A fire truck collision caused the accident, killing the pilot and co-pilot.