US: कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, हल्लेखोराचाही खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 05:13 IST2017-11-15T05:04:28+5:302017-11-15T05:13:47+5:30

उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये शाळेतील अनेक मुले जखमी झाले असल्याची माहिती आहे.

five dead US northern california shooting school | US: कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, हल्लेखोराचाही खात्मा

US: कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, हल्लेखोराचाही खात्मा

कॅलिफोर्निया : उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये शाळेतील अनेक मुले जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी बंदुकधारी हल्लेखोराचाही खात्मा केला आहे.



भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता प्राथमिक शाळेपासून अंधाधुंद गोळीबार  सुरु झाला. यात शाळेतील कोणीही ठार झाले नसले तरी अनेक मुले जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. शाळेला अजूनही पोलिसांनी गराडा घातलेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी टेक्सास येथे एका चर्चमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता.   

Web Title: five dead US northern california shooting school