अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक; 5 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 09:43 IST2019-05-14T07:19:34+5:302019-05-14T09:43:00+5:30
अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता झाला आहे.

अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक; 5 जणांचा मृत्यू, एक जण बेपत्ता
अमेरिका - अलास्कामध्ये दोन फ्लोट प्लेनची धडक होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फ्लोट प्लेनची एकमेकांना धडक झाली. अपघातात 10 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केन केव जावळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेलिलँड ऑटर डीसी-3 या जदोन फ्लोट विमानांची टक्कर झाली. अलास्कामध्ये झालेल्या या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. अपघात झाला त्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे. या दोन्ही विमानात 14 प्रवासी प्रवास करत होते. अपघातग्रस्त झालेले विमान ताकयुवान एअरलाईन्सचे प्रवासी हे Vancouver या ठिकाणी सुट्टीवर जात होते.
The Associated Press: The Coast Guard says six people are unaccounted for after two floatplanes went down in the water in southeast Alaska, US.
— ANI (@ANI) May 14, 2019