शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

आधी अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला; नंतर युद्धविराम प्रस्ताव, नुकसानभरपाई द्या; इराणची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 06:52 IST

अमेरिकेने इराणला युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविला आहे.

तेहरान : अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या युद्धनौकेवर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केल्याचा दावा इराणने बुधवारी केला; पण त्याला अमेरिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही. अमेरिकेने इराणला युद्धविरामासाठी १५ कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून पाठविला आहे. तसा दावा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, आता इराणनेही स्वतःचा युद्धविराम प्रस्ताव जारी केला असून, त्यात युद्ध नुकसानभरपाई आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपले सार्वभौमत्व मान्य करण्याची मागणी केली आहे.

त्याआधी अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावाची इराणने खिल्ली उडवली व चर्चेची शक्यता फेटाळली होती.  पश्चिम आशियामध्ये अमेरिकेने पॅराट्रूपर पाठवण्यास सुरुवात केली असतानाच दुसऱ्या बाजूला त्या देशाने युद्धविरामाचा प्रस्ताव इराणला पाठविला. त्यात पाकिस्तानने मध्यस्थीचे काम केले. त्याबाबत पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रस्तावात निर्बंधांमध्ये सवलत, नागरी अणू सहकार्य, इराणच्या अणू कार्यक्रमात कपात तसेच इतर मुद्यांचा समावेश आहे.

इस्रायलचे इराणमधील पायाभूत सुविधांवर हल्ले

इस्रायलने मात्र आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत बुधवारी पहाटे इराणमधील काझविन शहरात सरकारी पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल शेजारी देशांवर हल्ले सुरू ठेवले.  सौदी अरेबियाने आपल्या पूर्व प्रांतात इराणचे किमान आठ ड्रोन पाडल्याचे सांगितले, तर बहारीनमध्येही सायरन वाजले. कुवेतनेही इराणचे अनेक ड्रोन पाडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, आम्ही कधीही अण्वस्त्रे बाळगणार नाही असे इराणने सांगितले असून, होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित एक घोषणा तो देश करणार आहे. तीन आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेला विजय मिळाल्याचा दावाही त्यांनी पुन्हा  केला आहे. 

अमेरिकेने आपल्या लष्करी हालचाली वाढवल्या

युद्धविरामाचा प्रस्ताव पाठवितानाच अमेरिकेने आपल्या लष्करी हालचालीही सुरू ठेवल्या आहेत.  या देशाच्या ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे किमान १,००० सैनिक पश्चिम  आशियात पाठवले जातील, या क्षेत्रात अमेरिका दोन मरीन युनिट पाठविण्याच्या विचारात आहे.

इराणच्या नेतृत्वात मोठे बदल : अमेरिकेचा दावा

इराणच्या सध्याच्या नेतृत्वात मोठे बदल झाले आहेत असाही दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिका इराणशी चर्चा करत आहेत. मात्र, ही चर्चा कोणाशी सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. इराणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

‘शेजारी देशांवरील हल्ले इराणने थांबवावेत’

शेजारी देशांवर सुरू असलेले हल्ले इराणने तातडीने थांबवावेत. अन्यथा त्याचे आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात, तेलपुरवठ्यातही मोठे अडथळे निर्माण होऊन जागतिक संकट अधिक गहिरे होऊ शकते, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran demands compensation after attack, ceasefire proposal amid tensions.

Web Summary : Iran claims attack on US warship, proposes ceasefire demanding compensation and sovereignty over Hormuz Strait. US denies the attack. Israel strikes Iranian infrastructure, escalating regional conflict. Talks are on, claims US.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरAmericaअमेरिकाIranइराणPakistanपाकिस्तान