विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने चार वेळा ठेवले शारीरिक संबंध, लीक व्हिडीओमुळे पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 14:41 IST2021-12-18T14:39:26+5:302021-12-18T14:41:08+5:30

America Crime News : शिक्षिकेच्या व्हिडीओबाबत एका दुसऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली होती. ज्यानंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली.

Female teacher arrested after video allegedly shows her having physical relation with student | विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने चार वेळा ठेवले शारीरिक संबंध, लीक व्हिडीओमुळे पोलखोल

विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने चार वेळा ठेवले शारीरिक संबंध, लीक व्हिडीओमुळे पोलखोल

America Crime News : स्नॅपचॅट व्हिडीओत आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसलेल्या २० वर्षीय शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. अमेरिकेतील ही घटना असून एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शिक्षिकेने कोणतंही प्रोटेक्शन न वापरता चार वेळा तिच्या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले. शिक्षिकेच्या व्हिडीओबाबत एका दुसऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली होती. ज्यानंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली.

शिक्षिकेने मान्य केला गुन्हा

‘न्यूयॉर्क पोस्ट’ च्या रिपोर्टनुसार, पोल्क काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितलं की, लेकलॅंड हायस्कूलमध्ये इंग्रजी शिकवणारी शिक्षिका अयाना डोविस (Ayanna Davis) ला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान शिक्षिकेने तिचा गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की, तिने कोणतंही प्रोटेक्शन न वापरता चार वेळा आपल्या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले. दोनदा आपल्या घरी आणि दोनदा विद्यार्थ्याच्या घरी तिने असं केलं. अयानाचा जबाब पीडित विद्यार्थ्याच्या जबाबासोबत मिळत होता. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या वयाचा खुलासा केला नाही. पण असं मानलं जात आहे की, तो  १६ किंवा त्यापेक्षा कमी वयाचा असावा.

व्हायरल झाला होता व्हिडीओ

या प्रकरणाचा खुलासा शाळेतीलच एका विद्यार्थ्याने केला. शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जेव्हा एका विद्यार्थ्याने तो पाहिला तेव्हा त्याने शाळा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना हे सांगण्यात आलं. शिक्षिकेने आपला गुन्हा कबूल केला. मात्र, तिने विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती केली नाही, असं ती म्हणाली.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, शिक्षिकेने केलेलं कृत्य कायदेशीर गुन्हा आहे. ती या स्थितीत होती की, ती विद्यार्थ्यावर दबाव टाकू शकेल. तिने तिच्या पोजीशनचा चुकीचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलासोबत संबंध ठेवले. ज्यासाठी तिला शिक्षा मिळायला हवी. या घटनेनंतर शाळेवरही टीका होत आहे. 
 

Web Title: Female teacher arrested after video allegedly shows her having physical relation with student