पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:38 IST2025-11-09T14:36:04+5:302025-11-09T14:38:14+5:30
Florida Car Accident: अमेरिकेमध्ये एक भीषण अपघात झाला. भरधाव कारवर बारवर जाऊन धडकली. यात चार लोकांचा मृत्यू झाला. १३ लोक या घटनेमध्ये जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एक भरधाव कार बारवर जाऊन धडकली. या भीषण अपघातात चार लोक ठार झाले आहेत, तर १३ लोक जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे ही घटना घडली आहे. फ्लोरिडातील टांपा जिल्ह्यात हा अपघात घडला. जी कार बारवर जाऊन धडकली, त्या कारचा पोलीस पाठलाग करत होते.
टांपा पोलिसांनी सांगितले की, हवाई गस्त घालत असताना पोलीस पथकाला रात्री १२.४० वाजता फ्रीवेवर एक कार बेपर्वाईने जात जात असल्याचे दिसले.
हीच कार काही वेळाने दुसऱ्या एका रस्त्यावर दिसली. त्यानंतर कारचालक दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने कार चालवत होता.
त्यानंतर फ्लोरिडा महामार्ग गस्ती पथकाने या कारला पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे कळल्यानंतर कारचालकाने वेग वाढवला.
पण काही वेळाने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार याबोर शहराजवळी बारच्या भींतीवर जाऊन आदळली. बार समोर उभ्या असलेल्या लोकांना कारने चिरडले. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १३ लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी २२ वर्षीय चालकाला अटक केली असून, तपास सुरू केला आहे.