F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:01 IST2025-06-18T20:01:03+5:302025-06-18T20:01:37+5:30

F-35 लढऊ विमान हे लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. हे एक सिंगल सीट, सिंगल इंजिन, ऑल वेदर स्टील्थ मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे.

F-35 Shot Down Israel's fifth F-35 shot down, Iran's claim increases US tension! | F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 

F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 

इराण-इस्रायल संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या दोन देशांमध्ये सुरू असरेल्या युद्धाकडे लागले आहे. यातच, आपण इस्रायलचे पाचवे एफ-३५ लढाऊ विमान पाडले, असा दावा इराणने केला आहे. हा दावा बुधवारी वरामीन काउंटीच्या प्रमुखांनी केला आहे. IRNA या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, इराणच्या हवाई संरक्षण दलाने तेहरान प्रांतातील वरामीन शहरावर इस्रायलचे एफ-३५ लढाऊ विमान हाणून पाडले. तथापि, इस्रायलने अद्याप आपले एकही एफ-३५ लढाऊ विमान इराणमध्ये पाडल्याची पुष्टी केलेली नाही. मात्र, इराणचा हा दावा खरा ठरला, तर एफ-३५ हे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेसाठी हा मोठा धक्का असेल.

कशामुळे खास आहे F-35 -
F-35 लढऊ विमान हे लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. हे एक सिंगल सीट, सिंगल इंजिन, ऑल वेदर स्टील्थ मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. एयर सुपीरियॉरिटी आणि स्ट्राइक मिशन साठी हे विमान तयार करण्यात आले आहे. हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि गुप्तचर, पाळत ठेवणे आणि टोही मोहिमांसाठीही सक्षम आहे. 

आतापर्यंत इराणच्या ५८५ जणांचा मृत्यू -
इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध पेटले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत इराणचे ५८५ जण मारले गेले आहेत. तर १,३२६ जण जखमी झाले आहेत. अमेरिकास्थित मानवाधिकार गटाच्या माहितीनुसार, इस्रायली हल्ल्यांमध्ये २३९ इराणी नागरिक मारले गेले आहेत, तर १२६ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बुधवारीही सकाळपासूनच दोन्ही देशांकडून हल्ले सुरूच होते. याशिवाय आता इराणने सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापरही सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे, शक्यतो इराण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची माहिती शेअर करत नाही, मात्र, त्याने सोमवारी दिलेल्या डेटानुसार, तेव्हापर्यंत एकूण २२४ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय १२७७ जण जखमी झाले होते.

Web Title: F-35 Shot Down Israel's fifth F-35 shot down, Iran's claim increases US tension!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.