पाकिस्ताननं मैत्रीचा हवाला दिला, तरी चवताळलेल्या इराणंनं सौदीवर हल्ला केला; सांगितलं असं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:14 IST2026-03-04T14:13:00+5:302026-03-04T14:14:02+5:30

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सोमवारीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी डार यांनी सौदीवर हल्ला न करण्याचे आवाहन करत सौदी सोबोतच्या 'द्विपक्षीय संरक्षण करारा'ची आठवण करून दिली होती.

Even though Pakistan cited friendship, a frustrated Iran attacked Saudi Arabia did it give this reason? | पाकिस्ताननं मैत्रीचा हवाला दिला, तरी चवताळलेल्या इराणंनं सौदीवर हल्ला केला; सांगितलं असं कारण?

पाकिस्ताननं मैत्रीचा हवाला दिला, तरी चवताळलेल्या इराणंनं सौदीवर हल्ला केला; सांगितलं असं कारण?


मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहचला आहे. यातच, "पाकिस्तानने केलेली विनंती धुडकावून लावत इराणने सौदी अरबवर थेट हल्ला चढवला. मंगळवारी इराणच्या ड्रोनने रियाधमधील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य केले. यामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर, सौदी अरामकोचे मुख्यालय असलेल्या धाहरान शहरासह प्रमुख तेल शुद्धीकरण केंद्रांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तानचा इशारा आणि इराणचं प्रत्युत्तर -
दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सोमवारीच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी डार यांनी सौदीवर हल्ला न करण्याचे आवाहन करत सौदी सोबोतच्या 'द्विपक्षीय संरक्षण करारा'ची आठवण करून दिली होती. या करारानुसार सौदीवरील हल्ला हा पाकिस्तानवर हल्ला मानला जाईल, असा इशाराही डार यांनी इराणला दिला होता. या बदल्यात इराणने, सौदीच्या भूमीचा वापर इराणविरोधी कारवायांसाठी होणार नाही, असे आश्वासन मागितले होते. मात्र, या चर्चेनंतर केवळ २४ तासांतच इराणने रियाधवर हल्ला केला.

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि सौदी अरेबीया यांच्यातील संरक्षण करारासंदर्भात पहिल्यांदाच जाहीरपणे चर्चा झाली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या रक्षणासाठी बांधील आहेत. दरम्यान, सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचीही फोनवरून चर्चा झाली. दरम्यान पाकिस्तानने सौदीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, पाकिस्तानने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा आणि या प्रदेशात संघर्ष पसरल्याचा निषेध केला आहे, परंतु अमेरिकेच्या भूमिकेवर अथवा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात थेट भाष्य करणे टाळले.

दरम्यान, अमेरिका सौदीच्या भूमीचा वापर इराणविरोधात करत असल्यानेच हे हल्ले करण्यात आले असल्याचे इराणने स्पष्ट केले. इराणच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता पाकिस्तानची भूमिका निर्णायक ठरेल.

Web Title : पाकिस्तान की अपील के बावजूद ईरान ने सऊदी पर हमला किया, अमेरिका का हवाला

Web Summary : पाकिस्तान की चेतावनी को दरकिनार करते हुए ईरान ने सऊदी अरब पर हमला किया, रियाद में अमेरिकी दूतावास को निशाना बनाया। ईरान का दावा है कि अमेरिका सऊदी भूमि का उपयोग उनके खिलाफ करता है। पाकिस्तान ने बढ़ते तनाव के बीच सऊदी अरब को पूरा समर्थन दिया।

Web Title : Iran Attacks Saudi Despite Pakistan's Plea, Cites US Involvement

Web Summary : Ignoring Pakistan's warning, Iran attacked Saudi Arabia, targeting the US embassy in Riyadh. Iran claims America uses Saudi land against them. Pakistan reaffirmed support for Saudi Arabia amidst rising tensions and regional security concerns.