जेफ्री एपस्टीनची शिकार आता भारतीय तरुणी? लैंगिक शोषणाच्या फाईल्समधून खुलासा, सरकारकडून शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:00 IST2026-02-17T12:47:05+5:302026-02-17T13:00:24+5:30

जेफ्री एपस्टीनच्या लैंगिक शोषणाच्या जाळ्यात भारतीय तरुणी अडकल्याचे समोर आलं आहे.

Epstein Files Unmasked Indian Victim Revealed in Newly Declassified Documents | जेफ्री एपस्टीनची शिकार आता भारतीय तरुणी? लैंगिक शोषणाच्या फाईल्समधून खुलासा, सरकारकडून शोध सुरु

जेफ्री एपस्टीनची शिकार आता भारतीय तरुणी? लैंगिक शोषणाच्या फाईल्समधून खुलासा, सरकारकडून शोध सुरु

Epstein Victims: जगभरातील राजकारण आणि ग्लॅमर विश्वाला हादरवून सोडणाऱ्या जेफ्री एपस्टीन प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच सार्वजनिक करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार, एपस्टीनच्या शोषणाच्या जाळ्यात एक भारतीय तरुणी अडकली असल्याचे उघड झाले असून, अमेरिकन प्रशासन सध्या तिचा शोध घेत आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत सुमारे ३५ लाख पानांचा दस्तऐवज सार्वजनिक केला. यामध्ये १३ जानेवारी २०२० चा एक  ई-मेल समोर आला आहे. या ई-मेलमध्ये अमेरिकन अधिकारी एका भारतीय पीडितेचा उल्लेख करत असून, तिला नुकसान भरपाई आणि मानसिक उपचारांसाठी मदत देण्याबाबत चर्चा करत आहेत.

ई-मेलमध्ये काय?

अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतात असलेल्या या पीडितेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यूयॉर्क क्राईम व्हिक्टिम्स कॉम्पन्सेशन योजनेअंतर्गत या तरुणीला आर्थिक मदत आणि थेरपी देण्याचा सरकारचा मानस आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या पीडितेचे नाव आणि वैयक्तिक तपशील कागदपत्रांमध्ये काळ्या शाईने पुसण्यात आले आहेत.

बिल गेट्स आणि भारतीय राजकारण्यांचा उल्लेख

या फाईल्समध्ये केवळ पीडितेचाच नाही, तर काही बड्या नावांचाही संदर्भ आला आहे. ५ जून २०१४ रोजी एपस्टीनने बिल गेट्स यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये भारताचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा उल्लेख आहे. १७ सप्टेंबर रोजी बिल गेट्स यांची हर्षवर्धन यांच्याशी भेट होणार आहे का, अशी विचारणा एपस्टीनने केली होती. भारताचे प्रसिद्ध पीआर तज्ज्ञ दिलीप चेरियन यांचाही उल्लेख एका ई-मेलमध्ये आढळला आहे. २०१७ मध्ये एपस्टीनच्या एका सहकाऱ्याने त्यांना पॅरिसमध्ये भेटण्याबाबत उत्सुकता दाखवली होती.

एपस्टीनचे काळे साम्राज्य आणि लोलिता एक्सप्रेस

अब्जाधीश फायनान्सर जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्कमधील अतिशय प्रभावशाली व्यक्ती होता. २००५ मध्ये एका १४ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर त्याचे काळे कारनामे जगासमोर येऊ लागले. तो आपल्या लोलिता एक्सप्रेस या खाजगी विमानाने अल्पवयीन मुलींना मॅनहॅटन आणि पाम बीचवरील आपल्या आलिशान बंगल्यांवर नेत असे. तिथे मसाजच्या बहाण्याने मुलींचे लैंगिक शोषण केले जायचे. या कामात त्याची जोडीदार गिस्लीन मॅक्सवेल त्याला मदत करायची. २०१९ मध्ये अटक झाल्यानंतर खटला सुरू होण्यापूर्वीच एपस्टीनने तुरुंगात आत्महत्या केली. मात्र, त्याच्या मृत्यूनंतरही या प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे.

दरम्यान, आतापर्यंत एपस्टीन प्रकरण केवळ अमेरिका आणि युरोपपुरते मर्यादित असल्याचे मानले जात होते. मात्र, भारतीय तरुणीचा शोध घेण्याचे आदेश आणि भारतीय नेत्यांच्या नावांचा संदर्भ आल्यामुळे, एपस्टीनचे हे जाळे भारतातही पसरले होते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि परराष्ट्र विभाग आता या भारतीय पीडितेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून तिला न्याय आणि हक्काची मदत मिळवून देता येईल.

Web Title : एपस्टीन मामला: क्या भारतीय लड़की शिकार? यौन शोषण फाइलों से खुलासा, तलाश जारी

Web Summary : एपस्टीन के यौन शोषण फाइलों में भारतीय लड़की के शिकार होने की आशंका। अमेरिकी अधिकारी सहायता प्रदान करने के लिए उसकी तलाश कर रहे हैं। फाइलों में बिल गेट्स और भारतीय हस्तियों का भी उल्लेख है, जिससे भारत में एपस्टीन के नेटवर्क पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Epstein Case: Indian Girl Victim? Sex Abuse Files Spark Search

Web Summary : Epstein's sex trafficking files reveal a possible Indian victim. US officials are searching for her to provide support. The files also mention Bill Gates and Indian figures, raising questions about Epstein's network in India.