शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

Emotional Story: अश्रूंची झाली फुले : 33 वर्षांपूर्वी २००० किमी लांब विकलेले, आज आईला भेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 06:29 IST

बालतस्करीसाठी झाले हाेते अपहरण; २ हजार किलाेमीटर लांब विकले हाेते

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : बालपणी अपहरण करून विकण्यात आलेल्या चीनमधील एका तरुणाची तब्बल ३३ वर्षांनी आईसाेबत भेट झाली. भेटण्याची पूर्ण आशाच साेडलेल्या या मायलेकांची भेट झाल्यानंतर दाेघांनाही अश्रू आवरत नव्हते. हा प्रसंग पाहून जवळ असलेल्या सर्वांनाच गहिवरून आले. 

चीनच्या हेनान प्रांतात राहणाऱ्या ली जिंगवेई याचे १९८९ मध्ये अपहरण झाले हाेते. त्याला जवळपास २ हजार किलाेमीटर लांब गुआंगडाेंग प्रांतात एका दाम्पत्याला विकण्यात आले हाेते. 

आईवडिलांनी त्याचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र, ताे कुठेही सापडला नाही. आता ३३ वर्षांनी ताे आईला भेटायला आला. जिंगवेईने स्वत:च घराचा एक नकाशा बनविला हाेता. त्याच्या आधारे ताे घरी पाेहाेचला. त्याला पाहून आईला भेटला तेव्हा दाेघांच्या डाेळ्यातून आनंदाश्रू थांबत नव्हते. जिंगवेईचे लग्न झाले असून त्याला मुलेही आहेत. त्याचे कुटुंब पाहून त्याची आई खूप आनंदी आहे. 

असा झाला भेटीचा प्रवास...जिंगवेईचे अपहरण झाल्यानंतर एवढे वर्ष उलटून गेले तरीही ताे आईला विसरला नव्हता. आई आणि गावातल्या आठवणी त्याच्या मनात कायम हाेत्या. त्याला ज्यांनी खरेदी केले त्या दाम्पत्यालाही त्याने गावी जाऊ देण्याची विनंती केली हाेती. मात्र, त्यांनी नकार दिला.अनेक वर्षांनी त्याने मेंदूला ताण देऊन गावाचा एक नकाशा बनवला. ताे साेशल मीडियावर अपलाेड केला. साेबतच त्याने स्वत:चे अपहरण आणि विक्रीचीही गाेष्ट टाकली. जिंगवेईची गाेष्ट व्हायरल झाली आणि प्रकरण पाेलिसांपर्यंत पाेहाेचले. पाेलिसांनीही त्याची आणि त्याच्या आईची भेट घडवून आणण्याचा निर्धार केला. त्याच्या गावाचा शाेध घेतला. डीएनए चाचणीची मदत घेऊन आईचीही ओळख पटविली. अखेर ३३ वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मायलेकांची भेट घडवून आणली.

टॅग्स :chinaचीन