शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

निवडणुका शेजारच्या देशात पण चॅलेंज भारतासमोर, नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय गोखले यांची लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 12:56 IST

शेजारी देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

ठळक मुद्देनेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. भूतानमध्ये निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दृष्टीकोन यावर  संबंध ठरतील.

नवी दिल्ली - भारताचे नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय केशव गोखले यांच्यासाठी पुढच्या दीडवर्षाचा कालावधी आव्हानात्मक असणार आहे. डोकलामचा तिढा सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला. पुढच्या 16 महिन्यांमध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. तेच गोखले यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. 

या देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. नेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. के.पी.ओली हे भारत विरोधी आणि चीन समर्थक नेते आहेत. सांस्कृतिकदुष्टया नेपाळ भारताच्या जवळ असला तरी नेपाळमध्ये झालेले हे सत्तापरिवर्तन भारताला मानवणारे नाही. नेपाळला चीनच्या जास्त जवळ जाण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल. 

जून 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात फार काही सुधारणा होतील अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. सप्टेंबर 2018 मध्ये मालदीवमध्येही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या देशाचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आतापासूनच भारतविरोधी सूर लावला आहे. भूतानमध्येही याचवर्षी संसदीय निवडणूक होणार आहे. तिथे निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दुष्टीकोन यावर  संबंध ठरतील. सामरिकदुष्टीने भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. डोकलाम संघर्षात ते दिसून आले. 

2018 च्या अखेरीस बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत. भारताने बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुका भारतासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. सलग दोनवेळा सत्ता संभाळणा-या शेख हसीना यांच्या सरकारला प्रस्थापितांविरोधातील लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेजारी देशांमधील या निवडणुका भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. चीन गुंतवणूकीच्या माध्यमातून या सर्व देशांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भौगोलिक स्थानामुळे हे देश भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या देशांमधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान आजच्याघडीला भारतासमोर आहे.                                                       

टॅग्स :Indiaभारत