शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

इंग्लंडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव उत्साहात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 1:29 AM

सांगलीच्या शीतल चिमड यांचा पाच वर्षांपासून उपक्रम; २०० अनिवासी भारतीयांना जोडले

कोल्हापूर : मूळचे सांगलीचे असलेले शीतल चिमड यांनी इंग्लंडमध्ये गेली पाच वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे यंदा जवळपास २०० हून अधिक अनिवासी भारतीयांनी त्यांच्या घरी शाडूच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली. चिमड यांच्यामुळे गणेशोत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे इंग्लंडमधील अनिवासी भारतीय एकत्र आलेआहेत.

इंग्लंडमध्ये कोव्हेंट्री येथे राहणारे शीतल चिमड हे जग्वॉर लँड रोव्हर कंपनीत डिझायनिंग इंजिनिअर आहेत. सुरुवातीला पुण्यातील टाटा तसेच महिंद्रा कंपनीत त्यांनी नोकरी गेली; पण गेल्या पाच वर्षांपासून ते इंग्लंडमध्ये आहेत. पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्यात त्यांनी भारतात असतानाच पुढाकार घेतला होता.

इंग्लंडमध्येही व्यवसाय म्हणून गणेशमूर्ती तयार न करता केवळ भारतीय उत्सव परदेशातही जोमाने साजरा करावा, या हेतूने त्यांनी या मूर्ती तेथे उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी तेथील शाळांमध्येच गणेशाच्या या पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. त्यासाठी महिनाभर आधी कार्यशाळा घेऊन या मूर्ती कशा तयार करायच्या याची माहिती दिली. या कार्यशाळेत तयार झालेल्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची इंग्लंडमधील जवळपास २०० हून अधिक अनिवासी भारतीयांच्या घरी प्रतिष्ठापना केली गेली.

शाडूच्या मूर्तींचा शीतल चिमड यांचा आग्रहइंग्लंडमध्ये भारतीयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिनाभर आधीच चिमड यांच्याकडे गणेशमूर्तींची मागणी असते. नोकरीव्यतिरिक्त असलेला वेळ चिमड हे या मूर्ती तयार करण्यासाठी देतात. या कामात त्यांना घरच्यांचीही मदत मिळते.अनेक घरांमध्ये मूर्ती विकत न आणता घरीच तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते.

सार्वजनिक उत्सवात भारतीय संस्कृतीचे दर्शनइंग्लंडमधील सार्वजनिक गणेशोत्सवात विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. सर्वजण या काळात भारतीय पोशाख आणि खाद्यपदार्थांवर भर देतात. भारतीय खेळ, नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी रेलचेल असते. कोव्हेंट्री येथे ढोल-ताशा आणि लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशाचे स्वागत झाले असून उत्सवाची धूम सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Ganeshotsavगणेशोत्सव