अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 11:58 IST2025-05-19T11:47:05+5:302025-05-19T11:58:24+5:30

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी ८.५४ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

Earthquake tremors felt in Afghanistan again tremors felt near Pakistan border | अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले

अफगाणिस्तानात आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपअफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेजवळ अगदी जवळ जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ही माहिती दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये आज (१९ मे) सकाळी ०८. ५४ वाजता भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.२ इतकी मोजली. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानात होते, हे पाकिस्तानच्या सीमेजवळ जवळ होते.

पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!

चार दिवसांत चौथा धक्का

भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १४० किलोमीटर खाली होते. गेल्या ४ दिवसांत हा चौथा भूकंप आहे. प्रत्यक्षात अफगाणिस्तान भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्समधील फॉल्ट लाइनवर आहे. भारतीय प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली जाते तेव्हा हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात.

मागील गुरुवारी चीन आणि तुर्कीमध्ये भूकंप

 गुरुवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्यामुळे चीनची जमीन थरथरली आहे. चीनला आज भूकंपाचे धक्के बसले आहेत. एवढेच नाही तर गुरुवारी सायंकाळी तुर्कीला देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. 

पहाटे साडे तीनच्या सुमारास आलेल्या चीनमधील भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल मोजण्यात आली आहे. तर तुर्कीला बसलेला धक्का हा थोडा मोठा होता. तुर्कीला 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. चीनमधील भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १० किमीवर होते, असे सांगण्यात आले आहे. 

Web Title: Earthquake tremors felt in Afghanistan again tremors felt near Pakistan border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.