भारत पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या युद्धविरामनंतर पाकिस्तानात आणखी एक हादरा बसला आहे. हा हादरा कुठल्याही भारतीय मिसाईल अथवा ड्रोनने झाला नाही तर नैसर्गिक भूकंपामुळे पाकची जमीन हादरली आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल असून त्याचे केंद्र जमिनीपासून १० किमी अंतरावर होते. मागील आठवडाभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
याआधी सोमवारी ५ मे रोजी पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने पाकिस्तानातील भूकंपाची माहिती दिली आहे. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, घाबरलेले पाकिस्तानी नागरिक घरातून बाहेर पडले. हा भूकंप १ वाजून २६ मिनिटांनी झाला. शनिवारी १० मे रोजीही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.० रिश्टर स्केल होती. या भूकंपाचे केंद्र पश्चिम भागातील क्वेटा येथे होते.
अलीकडच्या काळात देश-विदेशात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. आपल्या जमिनीत ७ टेक्टोनिक प्लेट्स होते. ते सातत्याने आपल्या स्थानावर फिरत असतात. कधी कधी त्यात टक्कर होऊन घर्षण होते. त्यामुळेच भूकंपाचे धक्के जाणवू लागतात. त्यातून सर्वाधिक नुकसान पृथ्वीला होते. भूकंपामुळे इमारती कोसळतात, ज्यात ढिगाऱ्याखाली अडकून लोकांचा मृत्यू होतो. भारतातील एकूण ५९ टक्के भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. वैज्ञानिकानुसार भूकंप क्षेत्र झोन २, झोन, ३, झोन ४ आणि झोन ५ या ४ भागात विभाजित केलेत. झोन ५ सर्वाधिक धोकादायक समजला जातो. भारतात झोन ४ मध्ये भारताची राजधानी दिल्ली येते. जिथे ७ हून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवतात. ज्यातून मोठे नुकसान होऊ शकते.