शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियात भीषण दुष्काळ

By admin | Updated: June 18, 2015 01:42 IST

उत्तर कोरियात या शतकातील भीषण दुष्काळ पडला असून, आधीच अन्नधान्याचा तुटवडा सहन करणाऱ्या या देशात अन्नधान्य तुटवड्याची परिस्थिती

सेऊल : उत्तर कोरियात या शतकातील भीषण दुष्काळ पडला असून, आधीच अन्नधान्याचा तुटवडा सहन करणाऱ्या या देशात अन्नधान्य तुटवड्याची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या देशातील पाच वर्षांखालील प्रत्येक तिसरे मूल कुपोषित असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. ९० च्या दशकापासून उत्तर कोरियात दुष्काळ आहे. आंतरराष्ट्रीय मदतीवर कशीबशी गुजराण होत असताना अलीकडच्या काळात ही मदत जवळपास बंद झाली आहे. उत्तर कोरियाने मानवी हक्क कार्यकर्त्यांना देशात येण्यास बंदी घातलेली आहे. देशात चाललेले अन्नधान्याचे वितरण दाखविण्याची सरकारची तयारी नाही. देशात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, त्यामुळे तांदळाचे पीक घेणारे ह्वानगी व फ्यानगान हे प्रांत कोरडे पडले आहेत. हा १०० वर्षातील भीषण दुष्काळ आहे, असे उत्तर कोरिया सरकारने म्हटले आहे. उत्तर कोरियातील कृषी क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे. उत्तर कोरियात कधी पूर व कधी दुष्काळ यामुळे अन्नधान्याचे उत्पादन नेहमीच मार खाते. उत्तर कोरियात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता. हे पावसाचे प्रमाण ३० वर्षात सर्वात कमी होते. गेल्या वर्षीचा दुष्काळ यावर्षी पावसाचा तुटवडा असल्याने अधिकच तीव्र झाला आहे.