शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या भूमिकेवर शंका, युद्धात मध्यस्थीसाठी भारत सहभागी होऊ शकतो; इराणनं दाखवला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:29 IST

संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही

तेहरान - इराण युद्धात पाकिस्तान स्वत:ला मध्यस्थ देश म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यात त्याला फारसं यश मिळताना दिसत नाही. पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला पाठवलेले अमेरिकेच्या १५ अटींचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळून लावला. त्यानंतर पाकिस्तान निवडक इस्लामी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्‍यांची बैठक घेऊन पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करू लागला. परंतु आता इराणच्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वेगळी माहिती समोर आली आहे. इराणला भारताला मित्र राष्ट्र सांगत अमेरिकेसोबत चर्चेसाठी भरवसा असणारा देश म्हणून भारताचा उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेमुळे इराणच्या सरकारी सूत्रांनी प्रश्न उभे केलेत.

रिपोर्टनुसार, भारत हा इराणचा मित्र आहे. त्यामुळे भारत चर्चेत सहभागी होऊ शकतो. अमेरिकेसोबत मध्यस्थी करताना पाकिस्तानच्या भूमिकेवर इराणने शंका व्यक्त केली. पाकिस्तान कुठल्याही निकालाचे श्रेय घेऊ इच्छितो. आम्ही वाटाघाटी सुरू केल्याचे सर्व दावे फेटाळून लावतो किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी केलेले दावे ज्यात आम्ही त्यांच्या १५-कलमी शांतता प्रस्तावाला सहमत आहोत हेही नाकारतो. संभाव्य चर्चेसाठी आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे की नाही यावर इराणची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही असंही इराणच्या सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. CNN-News 18 ने हा रिपोर्ट प्रसारित केला आहे. 

इस्लामिक देशांना एकत्रित करून पाकिस्तान करतंय वातावरण निर्मिती

जेव्हा पाकिस्तान जगातील सर्वात शक्तिशाली मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना एकत्र करून स्वतःला शांततेचा दूत म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी हा रिपोर्ट आला आहे. केवळ एक दिवस आधी पाकिस्तानने अमेरिका-इराण चर्चेसाठी इस्लामाबादला एक ठिकाण म्हणून प्रस्तावित केले. सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर हा प्रस्ताव आला, ज्यामध्ये संघर्ष तात्काळ संपवण्यावर भर देण्यात आला होता. पाकिस्तानमध्ये झालेल्या तीन देशांच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनी आखाती संकटावर संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव खरा उपाय आहे असा पुनरुच्चार केला. या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार चार देशांनी इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव आणि संघर्ष तात्काळ संपवण्याचे आवाहन केले. या बैठकीत चार देशांनी मुस्लिम ऐक्यावर भर दिला आणि अमेरिका व इराण यांच्यातील चर्चेला पाठिंबा दिला.

भारतावर दाखवला विश्वास

भारत आणि इराण यांच्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत आहेत. दोन्ही देशांमधील हे संबंध १९५० च्या दशकापासून सुरू झाले होते. एकेकाळी भारत हा इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक होता परंतु भूराजकीय परिस्थितीमुळे त्यात घसरण झाली. तरीही भारताने इराणसोबत संबंध कायम ठेवले. भारत आणि इराण यांच्यात चाबहार बंदराबाबत मोठा करार झाला आहे. याशिवाय भारताला युरोपशी जोडणाऱ्या अनेक आर्थिक कॉरिडॉरमध्ये इराणचाही समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran distrusts Pakistan's role; India can mediate in conflict.

Web Summary : Iran questions Pakistan's mediation, rejecting its proposals. Iran trusts India for dialogue with the US, citing strong ties. Pakistan's efforts to unite Islamic nations are viewed skeptically. India and Iran share historical and strategic relations, including the Chabahar port deal.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणPakistanपाकिस्तानIndiaभारत