12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 22:01 IST2025-07-05T21:58:37+5:302025-07-05T22:01:38+5:30
ट्रम्प म्हणाले, बसून 15 वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्यापेक्षा सर्व देशांना नोटिस पाठवणे अधिक सोपे...

12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपला टॅरिफ हातोडा चालवणार आहेत. आपण ट्रेड संदर्भातील पत्रांवर स्वाक्षरी केली आहे, जे टॅरिफ संदर्भात देण्यात आलीली डेडलाइन संपण्यापूर्वीच संबंधित देशांना पाठवण्यात येतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
12 ट्रेड लेटर कोण कोणत्या देशांना पाठवले जाणार ? -
एअर फोर्स वन येथे पत्रकारांसोबत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, “मी काही पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. त्यांची संख्या साधारणपणे 12 एवढी आहे. ते सोमवारी (7 जुलै, 2025) पाठवले जातील.” हे 12 ट्रेड लेटर कोण कोणत्या देशांना पाठवले जाणार, याची घोषणा त्याच दिवशी केली जाईल,” असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
बसून मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा नोटिस पाठवणे सोपे... -
ट्रम्प म्हणाले, “बसून 15 वेगवेगळ्या मुद्यांवर काम करण्यापेक्षा सर्व देशांना नोटिस पाठवणे अधिक सोपे आहे. आम्ही यूकेसोबत असेच केले आणि हे दोन्ही देशांसाठी चांगले ठरले. याशिवाय आम्ही चीनसोबतही असेच केले होते. मला वाटते हे दोन्ही पक्षांसाठी फार चांगले ठरले आहे."
एक पत्र पाठवणे अत्यंत सोपे आहे, ज्यात -
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, 'एक पत्र पाठवणे अत्यंत सोपे आहे, ज्यात, "आम्हाला माहीत आहे की, काही देशांसोबत आमचे नुकसान होत आहे, तसेच काही देशांसोबत फायदाही होत आह. मात्र अशा देशांची संख्या फार कमी आहे. आपली अमेरिकेसोबत बिझनेस करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला हे टॅरिफ मान्य करावे लागेल," असे लिहिलेले असेल.