Donald Trump: 'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:04 IST2026-03-12T09:01:20+5:302026-03-12T09:04:45+5:30

इराणविरोधात २८ फेब्रुवारी सुरू करण्यात आलेले युद्ध अमेरिकेने जिंकले असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Donald Trump: 'We have won the war against Iran, now the US military is just...', Trump claims | Donald Trump: 'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा

Donald Trump: 'इराणविरोधातील युद्ध आम्ही जिंकलो आहोत, आता अमेरिकेचे सैन्य फक्त ...', ट्रम्प यांचा दावा

Donald Trump on Iran War: २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करत युद्धाची सुरूवात केली. १२ दिवस उलटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्रम्प यांनी इराणविरोधातीलयुद्ध आम्ही जिंकलो आहोत, असा दावा केला. सुरूवातीला केलेल्या काही हल्ल्यानंतरच युद्धाचा परिणाम समोर आला, असेही ट्रम्प म्हणाले. 

केंटकीमधील हेब्रॉन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली झाली. बुधवारी झालेल्या या रॅलीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध अमेरिकेने सुरुवातीच्या काही तासांमध्येच जिंकले, असा दावा केला. 

एका तासात अमेरिकेचा विजय झाला

"अमेरिकेच्या लष्कराने आधीच विजय निश्चित केला आहे, पण अमेरिका घाईघाईत सैन्य मागे घेणार नाही. आम्ही जिंकलो आहोत, असे तुम्हाला म्हणायला कधीच आवडत नाही. पण, आपण जिंकलो आहोत. पहिल्या तासाभरातच आपला विजय झाला. आता अमेरिकेचे सैन्य फक्त उर्वरित मोहीम फत्ते करण्याच्या कामात गुंतलेली आहे", असे डोनाल्ड ट्रम्प या रॅलीत म्हणाले. 

इराणच्या ५८ युद्धनौका उडवल्या

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला या लढाईचे श्रेय दिले. ते म्हणाले की, अमेरिकन सैन्याने इराणच्या ५८ युद्धनौका उद्ध्वस्त केल्या. हा इराणला सर्वात मोठा झटका आहे.

ऑपरेशन एपिक फ्युरी बद्दल ट्रम्प काय बोलले?

ट्रम्प यांनी इराणविरोधात सुरू केलेल्या युद्ध मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी नाव कसं दिलं गेलं याचाही किस्सा सांगितला. 

ते उपस्थित जनसमुदायाला म्हणाले, 'ऑपरेशन एपिक फ्युरी हे नाव कसे निवडण्यात आले. हे खरंच खूप चांगले नाव आहे का? जर तुम्ही जिंकलात तर ते ठीक आहे आणि आपण जिंकलो आहोत.'

'२० नावे माझ्यासमोर ठेवण्यात आली होती आणि मला झोप येत होती. मला त्यातील एकही नाव आवडले नाही. मग मी एपिक फ्युरी हे नाव बघितलं आणि मी म्हणालो की, मला हे नाव आवडले आहे', असा किस्सा ट्रम्प यांनी सांगितला. 

Web Title : ट्रंप का दावा: अमेरिका ने ईरान युद्ध जीता, सेना मिशन पूरा कर रही।

Web Summary : डोनाल्ड ट्रंप ने दावा किया कि अमेरिका ने ईरान के खिलाफ युद्ध कुछ ही घंटों में जीत लिया। उन्होंने कहा कि अमेरिकी सेना ने ईरान के 58 युद्धपोतों को नष्ट कर दिया। 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' के बाद सैनिक मिशन पूरा कर रहे हैं।

Web Title : Trump claims US won Iran war, forces completing mission.

Web Summary : Donald Trump claimed the US won the war against Iran in hours. He stated American forces destroyed 58 Iranian warships. Troops are completing the mission after 'Operation Epic Fury'.