Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 13:02 IST2025-06-15T13:01:27+5:302025-06-15T13:02:27+5:30
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. "जर इराणने कोणत्याही स्वरूपात, कोणत्याही प्रकारे आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य संपूर्ण ताकदीने तुमच्यावर तुटून पडेल, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेलं नसेल" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
शनिवारी इस्रायलने तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं आणि इराणच्या बुशेहर प्रांतातील साउथ पार्स गॅस फील्डशी जोडलेल्या नॅचरल गॅस प्रोसेसिंग युनिटवर हल्ला केला. याच दरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे.
( @realDonaldTrump - Truth Social Post )
— Donald J. Trump 🇺🇸 TRUTH POSTS (@TruthTrumpPosts) June 15, 2025
( Donald J. Trump - Jun 15, 2025, 12:32 AM ET )
The U.S. had nothing to do with the attack on Iran, tonight. If we are attacked in any way, shape or form by Iran, the full strength and might of the U.S. Armed Forces will come down on you… pic.twitter.com/LjTwDyDBkh
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, "ते इराण आणि इस्रायलमधील वाद सोडवण्यासाठी मार्ग काढू शकतात, करार करू शकतात आणि हा संघर्ष संपवू शकतात." रविवारी इराणने तेहरान आणि वॉशिंग्टन डीसी दरम्यान सुरू असलेल्या आण्विक चर्चेचा सहावा टप्पा रद्द केला.
रविवारी सकाळी इस्रायलच्या बट याममध्ये इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले. शहराच्या महापौरांनी ही माहिती दिली. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
हल्ल्यात सात जणांचा मृत्यू
इराणचे हल्ले शनिवारी सुरू झाले, जे रात्रभर आणि रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिले. देशभरात झालेल्या या हल्ल्यांमध्ये किमान सात जणांचा मृत्यू झाला, ज्यात एक १० वर्षांचा मुलगा आणि एक २० वर्षांची महिला यांचा समावेश आहे. १४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री किती इमारतींवर हल्ला करण्यात आला याची अद्याप पुष्टी झालेली नाही.