Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:54 IST2025-07-04T08:51:41+5:302025-07-04T08:54:01+5:30

Trump Putin talks: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. तासाभराच्या चर्चेत पुतीन यांनी ट्रम्प यांना रशिया युद्धातून माघार घेणार नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. 

donald trump vladimir putin talks Russia refuses to back down on Ukraine | Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं

Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं

Trump Putin Meeting: रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या प्रयत्नांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठा झटका दिला. गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात फोन कॉलवरून चर्चा झाली. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या संदर्भात पुतीन यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. जोपर्यंत लक्ष्य साध्य होत नाही, तोपर्यंत रशिया मागे हटणार नाही, युद्ध थांबवणार नाही, असे पुतीन यांनी ट्रम्प यांना ठणकावून सांगितलं. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय क्रेमलिनने याबद्दलची माहिती दिली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची फोनवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेवेळी युक्रेनविरोधात सुरू असलेली मोहीम रशिया तोपर्यंत कायम ठेवेल, जोपर्यंत सर्व लक्ष्य साध्य होत नाही, असे पुतीन यांनी स्पष्ट केले. 

ट्रम्प यांची विनंती पुतीन यांनी फेटाळली

पुतीन आणि ट्रम्प यांच्यात तासभर चर्चा चालली. याबद्दल अधिक माहिती देताना क्रेमलिनचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव माध्यमांना म्हणाले, मॉस्कोमध्ये सुरू असलेल्या संघर्षासाठी राजनैतिक तोडगा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, त्यामुळे मूळ कारणांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

वाचा >>डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?

उशाकोव म्हणाले, युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी ट्रम्प यांनी शस्त्रसंधी करण्याची विनंती केली, ती पुतीन यांनी फेटाळून लावली. हे युद्ध तब्बल साडे चार वर्षांपासून सुरू आहे. कीवसोबत (युक्रेन) राजनैतिक मार्गाने संवादातून समाधानकारक तोडगा काढण्यासाठी रशिया तयार आहे. 

पुतीन यांनी ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात सहाव्यांदा फोनवरून चर्चा झाली आहे. पुतीन यांनी ट्रम्प यांना अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामात रशियाचेही योगदान होते, असेही पुतीन ट्रम्प यांना म्हणाले. 

दोन्ही नेत्यांनी इराण-इस्रायलमधील संघर्ष, पश्चिम आशियातील घटनांसह इतर काही मुद्द्यांवरही चर्चा केली, असेही उशाकोव यांनी सांगितले. 

Web Title: donald trump vladimir putin talks Russia refuses to back down on Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.