"खामेनेई मारला गेला, जगाला न्याय मिळाला!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; संयुक्त राष्ट्राकडून महायुद्धाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 04:44 IST2026-03-01T04:43:32+5:302026-03-01T04:44:52+5:30

Ali Khamenei killed in airstrike news: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अयातुल्ला अली खमेनेईच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात आली असून युएन सुरक्षा परिषदेची आणीबाणीची बैठक सुरू झाली आहे. वाचा सविस्तर.

Donald Trump Truth Social Khamenei death "Khamenei was killed, the world got justice!" Donald Trump's big claim; UN warns of world war | "खामेनेई मारला गेला, जगाला न्याय मिळाला!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; संयुक्त राष्ट्राकडून महायुद्धाचा इशारा

"खामेनेई मारला गेला, जगाला न्याय मिळाला!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; संयुक्त राष्ट्राकडून महायुद्धाचा इशारा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, खामेनेई आमच्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टम आणि इंटेलिजन्सपासून वाचू शकला नाही.

"खामेनेईचा मृत्यू हा इराणच्या जनतेसाठी आणि ज्यांना त्याने त्रास दिला, त्या जगातील तमाम लोकांसाठी मिळालेला न्याय आहे," असे ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेने या मोहिमेत इस्रायलला पूर्ण तांत्रिक आणि लष्करी सहकार्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खामेनेई आणि त्यांच्या समर्थकांचा धोका आता संपल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

संयुक्त राष्ट्र चिंतेत
युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी 'गंभीर धोका' म्हटले आहे. गुटेरेस यांनी इशारा दिला की, या लष्करी कारवाईमुळे मध्य पूर्वेमध्ये अशा घटनांची साखळी सुरू होईल, जी कोणाच्याही नियंत्रणात नसेल.

सुरक्षा परिषदेची बैठक
इराणमधील २० शहरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. गुटेरेस यांनी हिंसा थांबवून चर्चेने मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : ट्रंप का दावा: खामेनेई मारा गया; संयुक्त राष्ट्र ने दी विश्व युद्ध की चेतावनी

Web Summary : ट्रंप ने अमेरिका-इज़राइल संयुक्त कार्रवाई में खामेनेई की मौत की घोषणा की, जिससे संयुक्त राष्ट्र चिंतित है। संयुक्त राष्ट्र ने मध्य पूर्व में बढ़ते संघर्ष की चेतावनी दी, ईरान में हमलों के बाद तत्काल तनाव कम करने का आह्वान किया।

Web Title : Trump Claims Khamenei Killed; UN Warns of Potential World War

Web Summary : Trump announced Khamenei's death in a joint US-Israeli operation, sparking UN concerns. The UN warns of escalating Middle East conflict, calling for immediate de-escalation after attacks in Iran and an emergency Security Council meeting.