Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 17:38 IST2025-08-14T17:37:57+5:302025-08-14T17:38:28+5:30

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबाबत भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के आणखी कर लादला. तो २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो.

Donald Trump Tariffs If donald Trump-Putin talks fail, we will impose more tariffs on India new threat from America | Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी

Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादलेत. भारतावररशियाकडून तेल आयात केल्यामुळे हे कर लादल्याचा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे, उद्या शुक्रवारी रशिया -युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा होणार.

इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा

शुक्रवारी अलास्का येथे होणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले. पण,  अमेरिकेने या बैठकीचा संबंध भारत आणि टॅरिफ वॉरशी जोडला आहे. या बैठकीवरुन अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी भारताला धमकी दिली. जर ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली तर अमेरिका भारतावर अधिक टॅरिफ लादेल, अशी धमकी त्यांनी दिली.

बैठकीतील निर्णयावर टॅरिफ ठरणार

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट म्हणाले की, अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठकीच्या निकालांच्या आधारे, वॉशिंग्टन भारतावर दुय्यम शुल्क आणखी वाढवू शकते. "रशियन तेल खरेदी करण्यासाठी आम्ही भारतावर आधीच दुय्यम शुल्क लादले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर निर्बंध किंवा दुय्यम शुल्क वाढवले जाऊ शकतात", असंही बेसंट म्हणाले.

या महिन्याच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याच्या कारणावरुन भारतावर सध्याच्या २५ टक्के शुल्काव्यतिरिक्त २५ टक्के दंड लादला होता, हा २७ ऑगस्टपासून लागू केला जाऊ शकतो. दरम्यान, आता अमेरिकेने सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला. 

ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केले

'भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि ते जागतिक बाजारात चढ्या किमतीत विकतो आणि मोठा नफा कमावतो', असा आरोप ट्रम्प यांनी केला. रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला निधी देत आहे असा आरोपही त्यांनी केला. भारताने या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

Web Title: Donald Trump Tariffs If donald Trump-Putin talks fail, we will impose more tariffs on India new threat from America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.