डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:16 IST2025-10-14T08:53:13+5:302025-10-14T09:16:03+5:30
गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि भारत आणि पाकिस्तान एकत्र राहण्याची शक्यता शाहबाज शरीफ यांना व्यक्त केली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्या विधानाशी सहमती दर्शवली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
मागील काही वर्षांपासून चालू असलेलं इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध आता पूर्णपणे थांबण्याच्या मार्गावर आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. हमास आणि इस्त्रायलने तो प्रस्ताव स्वीकारला. हमास शांतता शिखर परिषदेत जगभरातील नेत्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या असीम मुनीर आणि शरीफ यांचे कौतुक केले. तर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता कौतुक केले.
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
इजिप्तमध्ये झालेल्या गाझा शांतता परिषदेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांचे कौतुक केले. या दरम्यान, शाहबाज शरीफ त्यांच्या मागे उभे असताना त्यांनी हे विधान केले. शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान खूप चांगले एकत्र राहू शकतात असा विश्वास व्यक्त केला.
ट्रम्प पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत म्हणाले, "भारत हा एक उत्तम देश आहे. माझे एक खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी खूप चांगले काम केले आहे." यावेळी त्यांनी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या शाहबाज शरीफ यांना विचारले, "ठीक आहे?" शरीफ हसले आणि सहमतीने मान हलवली.
भारत- पाकिस्तानमधील युद्ध ट्रम्प यांनी थांबवले- शाहबाज शरीफ
भारत- पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवला, असे शाहबाज शरीफ म्हणाले. शरीफ यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचे श्रेय ट्रम्प यांना दिले. दुसरीकडे भारताने हा दावा फेटाळले आहे.
भारताविरुद्ध वारंवार विष ओकणारे पाकिस्तानी पंतप्रधान, भारत आणि पाकिस्तान एकत्र राहू शकतात या ट्रम्प यांच्या दाव्याशी सहमती दर्शवल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.
गाझा शांतता शिखर परिषद
गाझा शांतता शिखर परिषद इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे आयोजित करण्यात आली होती. हे शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. यापूर्वी इस्रायल-पॅलेस्टाईन शांतता चर्चा आयोजित केली होती. या शिखर परिषदेत २०२३ पासून सुरू असलेला इस्रायल-हमास संघर्ष संपवणे आणि शांतता प्रक्रिया मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
#WATCH | Egypt | US President Donald Trump says, "India is a great country with a very good friend of mine at the top and he has done a fantastic job. I think that Pakistan and India are going to live very nicely together..."
— ANI (@ANI) October 13, 2025
(Video source: The White House/YouTube) pic.twitter.com/rROPW57GCO