डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:38 IST2025-06-23T16:36:25+5:302025-06-23T16:38:28+5:30

इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत...!

Donald Trump himself took the axe to the US economy, now the key at Iran americas economy faces surging oil prices | डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!

अमेरिकेतील सामान्य जनतेला बऱ्याच दिवसांनंतर महागाईपासून दिलासा मिळाला होता. मात्र त्यांचा हा आंनंद फार काळ टिकेल असे दिसत नाही. तेथील अर्थव्यवस्थेल पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, आता तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती आधीच ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. ज्या मार्गानेत जगातील २० टक्के एढ्या कच्च्या तेलाचा पुरवठा होतो.

इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत -
जानेवारी महिन्यापासून अमेरिकेत तेलाचे दर ८० डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलेले नाहीत. ऑगस्ट २०२४ पासून ते साधारणपणे ६० ते ७५ डॉलर प्रति बॅरलदरम्यान आहेत. तेलाच्या किमती कमी असल्याने, देशातील अनेक भागांत पेट्रोलचे दर ३ डॉलर प्रति गॅलनच्या खाली आले आहेत. यामुळे महागाईने त्रस्त ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, १३ जून रोजी इस्रायलने अचानकपणे केलेल्या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती सुमारे १०% वाढल्या आहेत.

तेलाच्या किमती भविष्यात कोणत्या दिशेला जातील, हे इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासंदर्भात काय निर्णय घेतो, यावर अवलंबून असेल. खरे तर, हा एक महत्त्वाचा व्यापार मार्ग आहे. ज्याद्वारे जगातील सुमारे २०% कच्च्या तेलाचा व्यापार चालतो. दरम्यान, आपल्या देशाकडे अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक पर्याय आहेत, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते. यातच, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या एका प्रमुख सल्लागाराने आधीच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचे आवाहन केले आहे.

...तर इराणवरील लष्करी हल्ल्यांची शक्यता आणखी वाढेल -
तज्ज्ञांच्या मते, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून जगाचा तेल पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला, तर त्यावरील लष्करी हल्ल्यांची शक्यता आणखी वाढेल. इराण, पर्शियन आखातातील तेल आणि वायू प्रक्रिया आणि निर्यात करण्यासाठी बांधलेल्या पायाभूत सुविधांवर देखील हल्ला करू शकतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, तेलाच्या किमती वाढण्याची भीती निर्माण करणे. इराणला प्रत्यक्षात ती भीती निर्माण करावी लागेल.

Web Title: Donald Trump himself took the axe to the US economy, now the key at Iran americas economy faces surging oil prices