रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:10 IST2025-08-22T09:10:14+5:302025-08-22T09:10:50+5:30
"ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.'

रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात थेट हस्तक्षेप करण्यापासून माघार घेतली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आधी अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय भेटावे, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे.
द गार्डियनने प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी पुढच्या टप्प्यावरील शांतता चर्चेत थेट सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आधी अमेरिकेच्या मध्यस्थीशिवाय भेटावे, अशी त्यांची इच्छा आहे.
एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ट्रम्पच्या मते, युक्रेन युद्ध संपवण्याचे पुढचे पाऊल म्हणजे, व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील द्विपक्षीय बैठक आहे. ही बैठक प्रत्यक्षात होईल की नाही, हे निश्चित नाही.'
'मला केवळ बैठकीत काय होते हे बघायचे आहे...' -
ट्रम्प यांनी WABC रेडिओचे होस्ट मार्क लेव्हिन यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले, "मला केवळ बैठकीत काय होते हे बघायचे आहे. आपण दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय चर्चेची तयारी करत आहोत."
अधिकारिऱ्यांनी द गार्डियनला सांगितले की, ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना निर्देश दिले आहेत की, ते स्वतः उपस्थित राहणाऱ्या कोणत्याही त्रिपक्षीय बैठकीपूर्वी, पुतिन आणि झेलेन्स्की यांची बैठक व्हावी. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांची ही रणनीती निवडणूक घोषणांपेक्षा अगदी वेगळी आहे. त्यांनी निवडणूक काळात तत्काळ यशाचा दावा केला होता.