भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 21:23 IST2025-08-04T21:22:48+5:302025-08-04T21:23:19+5:30
America on India: रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर अधिक कर लादण्याची धमकी दिली आहे. भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करत आहे आणि ते बाजारात अधिक नफ्यात विकत आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले आहेत, याची भारताला पर्वा नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे सल्लागार स्टीफन मिलर यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, असे म्हटले आहे.
ट्रम्प यांचे सल्लागार स्टीफन मिलर यांनी आज फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत अमेरिकेशी प्रामाणिकपणे वागत नसल्याचे म्हटले आहे. भारत स्वतःला अमेरिकेला जवळचा देश म्हणतो. परंतु, असे असूनही ते आमच्या वस्तूंना मान्यता देत नाही आणि अमेरिकन वस्तूंवर मोठे शुल्क लादतात. भारत अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणाचा चुकीचा फायदा घेतो. भारत आता रशियाकडून तेल खरेदी करून त्यांना युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवत आहे, असे ते म्हणाले.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या दबावामुळे आणि वाढत्या किंमतींमुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे जवळजवळ बंद केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, एएनआयने भारतीय कंपन्या अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतावर अधिक कर लादण्याची धमकी दिली आहे.