कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:24 PM2020-03-16T16:24:25+5:302020-03-16T16:32:56+5:30

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

divorce applications increases in china after the corona infection sna | कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

कोरोनामुळे बंद दाराआड नवरा-बायकोचे पटेना, घटस्फोटांच्या अर्जात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना व्हायरस संसर्गाचे जगभरात उमटतायेत पडसाद चीनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढलेइटलीमध्ये इंटरनेटचा वापर वाढला

बिजिंग/रोम : जगभरात कोरोनाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. यातच चीनमध्ये या व्हायरसमुळे घटस्फोटांच्या प्रकरणात वाढ झाल्याचेही समोर आले आहे. चीनच्या शिचुआन प्रांतात एका महिन्यात तब्बल 300 हून अधिक कुटुंबीयांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
 
डाझोऊ भागातील लग्न नोंदणी कार्यालयाचे व्यवस्थापक लू शिजून यांनी म्हटले आहे की, 'शेकडो कुटुंबीये  आपले लग्न मोडून घटस्फोटाचा विचार करत आहेत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांनी घटस्फोटासाठी अर्ज केले आहेत. यातील बहुसंख्य प्रकरणांमध्ये पती-पत्नी बराच काळ घरात एकत्र असल्याने त्यांच्यातील वादाचे आहे. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसमुळे ऑफिस बंद असल्याने घटस्फोट प्रकरणांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. 

इटलीमध्ये इंटरनेटचा वापर वाढला
चीन नंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. येथी नागरिकांवर आपल्या घरातच बंदिस्त होण्याची वेळ आली आहे. यामुळे इटलीतमध्ये इंटरनेटच्या मागणी 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथील लोक वेबसीरीज पाहून आणि ऑनलाईन गेम खेळून वेळ घालवत आहेत.
 

Web Title: divorce applications increases in china after the corona infection sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.