केळीच्या घडावरून वाद; बांगलादेशात हिंदूची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 07:46 IST2026-01-19T07:46:11+5:302026-01-19T07:46:27+5:30
एकाच कुटुंबातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

केळीच्या घडावरून वाद; बांगलादेशात हिंदूची हत्या
ढाका: बांगलादेशातील गाझीपूर जिल्ह्यात केळीच्या घडावरून झालेल्या वादानंतर जबर मारहाण केल्याने एका हिंदू व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशात काही दिवसांपासून हिंदूंच्या होत असलेल्या हत्येशी या घटनेचा संबंध आहे किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचा दावा येथील माध्यमांनी केला आहे.
हॉटेलसाठी केळीची चोरी
लिटन चंद्र घोष (५५) असे हत्या झालेल्या हिंदू व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे 'बैशाखी स्वीटमीट अँड हॉटेल' आहे. याच भागात मासूम मिया या आरोपीची केळीची बाग आहे. बागेतून एक केळीचा घड गायब झाला होता. तो लिटन यांच्या हॉटेलमध्ये आढळला. त्यानंतर हॉटेल व्यावसायिक व बागवान यांच्यात वाद झाले. मारहाणीत घोष यांचा जागीच मृत्यू झाला.