# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:17 AM2020-01-22T05:17:46+5:302020-01-22T05:18:08+5:30

हॅशटॅगचा वापर सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल, असा कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दात हॅशटॅगची कल्पना समोर आणणारे क्रिस मेसिना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Didn't even think the # hashtag would be widely used | # हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता

# हॅशटॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होईल याचा विचारही केला नव्हता

Next

अहमदाबाद : हॅशटॅगचा वापर सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल, असा कधी विचारही केला नव्हता, अशा शब्दात हॅशटॅगची कल्पना समोर आणणारे क्रिस मेसिना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. १२ वर्षांपूर्वी नागरिकांना आॅनलाईन नेटवर्कशी जोडण्यासाठी याचा उपयोग सुरू केला होता. इंटरनेटवरील आगामी मोठी गोष्ट म्हणजे टच स्क्रीनऐवजी ‘व्हाईस बेसड् युसीज’ही असणार आहे, असेही ते म्हणाले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, हॅशटॅगची कल्पना आॅनलाईनच्या एका अशा ठिकाणाची होती जेथे कोणीही चर्चा सुरू करू शकतो आणि अन्य लोक यात सहभागी होऊ शकतात. मूळचे अमेरिकेचे असलेले क्रिस मेसिना असेही म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर वाढत असताना लोकांनी वास्तविक जीवनात संवाद साधण्याची क्षमता हरवून बसायला नको.

इंटरनेटवरील आगामी मोठी गोष्ट म्हणजे ‘व्हाईस बेसड् युसीज’ही आहे. हॅशटॅगचा प्रथम वापर करताना मी याची कधी कल्पना केली वा चिंतन केले, गरज नाही; पण मी विचार केला होता की, सोशल मीडिया खूप महत्त्वाचा असेल. २००७ मध्ये इंटरनेटचे युजर्स जेव्हा खूप कमी होते तेव्हा वेबसाईट सुरू करण्यासाठी लोकांना केंद्रीय प्राधिकरणाकडे जावे लागत होते.

२४ आॅगस्ट २००७ रोजी त्यांनी हॅशटॅगचा प्रथम उपयोग टिष्ट्वटर टाईमलाईनवर केला होता. त्यानंतर ते टिष्ट्वीटरच्या आॅफिसमध्येही गेले होते आणि आपली आयडिया त्यांना सांगितली; पण त्यावेळी ती फेटाळण्यात आली होती. मात्र, टिष्ट्वटरने आपल्या अंतर्गत व्यवस्थापनात याचा उपयोग सुरू केला. त्यानंतर इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मने याचा स्वीकार केला. (वृत्तसंस्था)

अनेक मोहिमांमध्ये वापरला जातो हॅशटॅग

आज १२ वर्षांनंतर हॅशटॅग सोशल मीडियावरील एक ताकद झाला आहे. या प्रतीकाचा उपयोग कनेक्टिव्हिटीसाठी केला जात आहे. अगदी # मीटूची मोहीम असो की, # सीएएचे आंदोलन असो, हॅशटॅगचा उपयोग अशा अनेक ठिकाणी केला जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’अंतर्गत संवाद साधला आणि ही चर्चा # विदआऊट फिल्टर होईल, असे स्पष्ट केले. क्रिस मेसिना यांनी म्हटले आहे की, हॅशटॅगच्या मुद्रीकरणाबाबत कधी विचार केला नाही. अन्यथा यामाध्यमातून अब्जावधी कमविता आले असते.

Web Title: Didn't even think the # hashtag would be widely used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.