पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:32 IST2025-10-26T18:31:44+5:302025-10-26T18:32:04+5:30
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील लूवर संग्रहालयात धूमस्टाईलने चोरी करून मौल्यवान रत्ने लांबवण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलं असून, लूवर संग्रहालयातून मौल्यवान रत्नांची चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील लूवर संग्रहालयात धूमस्टाईलने चोरी करून मौल्यवान रत्ने लांबवण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलं असून, लूवर संग्रहालयातून मौल्यवान रत्नांची चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. लूवर संग्रहालयातून चोरांनी काही मिनिटांमध्येच १०२ दशलक्ष डॉलर किमतीची मौल्यवान रत्ने लांबवली होती. दरम्यान, पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं उघड केलेली नाहीत.
चोरट्यांनी १९ ऑक्टोबर रोजी ही चोरी केली होती. लिफ्टच्या मदतीने हे चोर संग्रहालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी संग्रहालयातील नोपोलियनच्या ऐतिहासिक दागिन्यांवर डल्ला मारला होता. समोर येत असलेल्या वृत्तानुसार चोर लूवर संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये चढले होते. त्यानंतर त्यांनी खिडकी तोडली. एलढंच नाही तर चोरी करण्यासाठी त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेला खोकाही तोडला. त्यानंतर चोरांनी तिथून १९ व्या शतकातील नोपोलियनचे मौल्यवान आणि ऐतिहासिक दागिने लांबवले होते.
या चोरांनी संग्रहालय उघडण्याच्या वेळी एका क्रेनचा वापर करून वरची खिडकी चोरली. त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले होते. या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. तसेच चोरीची ही घटना देशासाठी लाजीरवाणी असल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत.