शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात हिंदूंची २० मंदिरे उद्ध्वस्त

By admin | Updated: November 2, 2016 04:19 IST

एका आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या बांगलादेशमधील रहिवाशांनी चितगाव येथील २0 हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली

ढाका : सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे संतप्त झालेल्या बांगलादेशमधील रहिवाशांनी चितगाव येथील २0 हिंदूंच्या मंदिरांची नासधूस केली आणि १00 हून अधिक हिंदूंच्या घरांची तोडफोड केली. ही घटना रविवारी घडली. फेसबूकवर इस्लामसंदर्भात उल्लेख केल्याचे आढळल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. मशिदीबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणी करत रविवारी हजारो लोकांनी मोर्चा काढला होता. मुस्लिमांची पवित्र स्थळे असलेल्या ठिकाणी हिंदू देवता दाखवल्यामुळे लोक संतापले होते, असे सांगण्यात येते. त्या मोर्चात सहभागी झालेल्या १५0 ते २00 परिसरातील ५ मंदिरांमधील ७ मूर्तींची तोडफोड केली, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अब्दुल करीम यांनी दिली. या तोडफोडीदरम्यान काही जण जखमी झाले असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक हिंदूंच्या मते मात्र हिंदूंच्या २0 मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. मोर्चातील लोकांनी अनेक मूर्तींची तोडफोड व विटंबना केली आणि हिंदूंच्या १00 हून अधिक घरांची तोडफोड केली आणि तेथील मौल्यवान वस्तू लुटल्या, अशी तक्रार आहे. मोर्चेकऱ्यांनी हिंदूंच्या घरांतील ऐवज लुटल्याचा आरोप नासीरनगर पूजा समितीचे महासचिव खैलपाद पोद्दार यांनी केला. ढाक्यापासून १५0 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. ज्याने फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली, त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र पोस्ट टाकणारी व्यक्ती तीच असल्याचे स्पष्ट झालेले नाही. (वृत्तसंस्था)