शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 4:40 AM

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून...

लंडन - सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून, सुमारे 87 मिलियन (म्हणजेच 8 कोटी 70 लाख) फेसबुक युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाने गोळा केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुमारे 50 मिलियन युझर्सचा डेटा चोरण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.  खूप मोठा आहे.  फेसबूकचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफीसर  माईक स्कूफर यांनी लिहिलेल्या ब्लॉगमधून ही माहिती समोर आली आहे. अॅप्लिकेशन्सद्वारे फेसबूकशी जोडले जाणारी त्रयस्त मंडळी युझर्सची माहिती चोरत असल्याचे द गार्डियनने म्हटले आहे.  दरम्यान, हे प्रकार रोखण्यासाठी फेसबूक युझर्सची वैयक्तिक माहिती अधियक सुरक्षित ठेवण्यासाठी काही बदल करणार आहे. या बदलांनुसार थर्ड पार्टी अॅपच्या डेव्हलपर्सना फेसबुक युझर्सच्या वॉलवरील माहितीचा अॅक्सेस मिळणार नाही.  

 फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबुकवरील आपले पेज डिलीट करत आहेत. टेस्ला, स्पेस एक्स, कॉमर्ज बॅंक आणि मोजला यासारख्या कंपन्यांनी  आपले फेसबुकवरील पेज डिलीट केले आहे. तसेच, अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकला लोकांविषयींची माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.  तसेच, गूगलवर फेसबुकवरील आपले अकाउंट कशाप्रकारे डिलीट करावे, यासाठी मोठ्याप्रमाणात सर्च करण्यात येत आहे.   दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे. 

टॅग्स :FacebookफेसबुकCambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिका