नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 22:48 IST2020-04-23T22:46:21+5:302020-04-23T22:48:55+5:30

नर्सरीमधील 52 चिमुकल्यांच्या पालकांना पत्र पाठविले गेले होते .

Cruelty in nursery, rape and sexual abuse of a minors pda | नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

नर्सरीत चिमुकल्यांसोबत घडला क्रूर प्रकार, अल्पवयीन मुलाने केले लैंगिक शोषण

ठळक मुद्दे जॉन नेल्सन यांनी पत्नी पम आणि मुलगी लिंडसे यांच्याबरोबर नर्सरी सुरु केली.जुलै 2019 मध्ये टोरक्वे येथे जॅक आणि जिल चाईल्ड केअर येथे लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली एका 17 वर्षाच्या मुलावर आज [२२ एप्रिल]  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेव्हॉन - १७ वर्षीय अल्पवयीन मुलास बलात्काराच्या एका गुन्ह्यासह ८ मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर बलात्काराच्या दोन गुन्ह्यांचा आरोप लावण्यात आला आहे, परंतु हे नर्सरीशी जोडलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.खासगीरित्या चालविलेल्या चाईल्डकेअर नर्सरीमध्ये मुलांची जन्मापासून ते पाच वर्षांच्या चिमुकल्यांची काळजी घेतली जात होती आणि ही नर्सरी ५१ आठवडे चालविण्यात आली. मात्र, ती पोलीस चौकशीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती.

 

लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर गेल्या उन्हाळ्यात या नर्सरीची चौकशी सुरू केली होती. पोलिस, स्थानिक प्राधिकरण, एनएचएस डेव्हन क्लिनिकल कमिशनिंग ग्रुप आणि ऑफस्टेड अशा अनेक यंत्रणांनी चौकशीत सहकार्य करून तपासात सामील झाले होते. नर्सरीमधील 52 चिमुकल्यांच्या  पालकांना पत्र पाठविले गेले होते .

जॉन नेल्सन यांनी पत्नी पम आणि मुलगी लिंडसे यांच्याबरोबर नर्सरी सुरु केली. त्यापैकी कोणीही या आरोपांमध्ये सामील असल्याचे समजलेले नाही. डेव्हॉन आणि कॉर्नवॉल पोलिसांनी आज माहिती दिली की, याप्रकरणी अल्पवयीन मुलास  कोर्टात हजर करण्यात येईल "जुलै 2019 मध्ये टोरक्वे येथे जॅक आणि जिल चाईल्ड केअर येथे लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली एका 17 वर्षाच्या मुलावर आज [२२ एप्रिल]  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१८ वर्षाखालील मुलाची ओळख आम्ही स्पष्ट करू शकत नाही. म्हणून आम्ही जनतेला या प्रकरणात पीडित किंवा संशयिताच्या ओळखीबद्दल त्यांनी अंदाज लावू नका, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

Web Title: Cruelty in nursery, rape and sexual abuse of a minors pda