शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायक ! ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीत 480,000,000 वन्यजीवांचा जळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 10:10 IST

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात 14 हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आ

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीत जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय.  

 

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात 14 हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या 1 लाख लोकांपैकी 70 टक्के लोक येथून निघून गेले आहेत. माऊंट होथममध्ये 67 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग 80 कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८२ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झाले आहे. या महाभयंकर आगीत तेथील वन्यजीवन खाक झालं आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्दऑस्ट्रेलियातील आगीचे संकट पाहता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून सुरूहोणारा आपला चार दिवसांचा दौरा रद्द केला आहे. अर्थात, आगामी महिन्यात आपला दौरा पुन्हा निश्चित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या दौºयात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते. स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे की, आमचा देश सध्या जंगलातील भीषण आगीच्या संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाfireआगAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारDeathमृत्यू