'भेकडांनो, ही बाब आम्ही लक्षात ठेवू’, होर्मुझबाबत हात वर करणाऱ्या NATO देशांवर ट्रम्प भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:31 IST2026-03-20T20:29:54+5:302026-03-20T20:31:02+5:30

Donald Trump News: इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने संपूर्ण जगभरात होणाऱ्या इंधनाच्या वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधील देशांची खरडपट्टी काढली आहे. तसेच नाटो देश हे अमेरिकेविना कागदी वाघ आहेत, असा टोला लगावला आहे.

'Cowards, we will remember this', Donald Trump lashed out at NATO countries for raising their hands over Hormuz | 'भेकडांनो, ही बाब आम्ही लक्षात ठेवू’, होर्मुझबाबत हात वर करणाऱ्या NATO देशांवर ट्रम्प भडकले 

'भेकडांनो, ही बाब आम्ही लक्षात ठेवू’, होर्मुझबाबत हात वर करणाऱ्या NATO देशांवर ट्रम्प भडकले 

अमेरिकेने इस्राइलसह मिळून इरणविरोधात सुरू केलेलं युद्ध २१ दिवस लोटले तरी सुरूच आहे. तसेच इराणकडून होत असलेल्या कडव्या प्रतिकारामुळे अमेरिका आणि इस्राइलला हवे तसे यश मिळताना दिसत नाही आहे. त्यातच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केल्याने संपूर्ण जगभरात होणाऱ्या इंधनाच्या वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटोमधील देशांची खरडपट्टी काढली आहे. तसेच नाटो देश हे अमेरिकेविना कागदी वाघ आहेत, असा टोला लगावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून नाटो देशांना फटकारले आहे. तसेच नाटो देश अणुशक्ती असलेल्या इराणला रोखण्यासाठीच्या लढाईत सहभागी होऊ इच्छित नव्हते, असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, नाटो देश होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेची मदत करू इच्छित नाहीत. खरंतर ही एक सोपी लढाई होती. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असणे हे जगभरात तेलाच्या किमती वाढण्याचे एकमेव कारण आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

यावेळी नाटो देशांवर संताप व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, खरंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचं काम खूप सोपं होतं. तसेच त्यामध्ये जोखिमही खूप कमी होती. मात्र नाटो देशांनी दाखवलेला भेकडपणा आम्ही लक्षात ठेवू, असा इशाराही त्यांनी दिला.  

Web Title : होर्मुज जलडमरूमध्य पर नाटो की निष्क्रियता पर ट्रम्प का हमला, उन्हें डरपोक कहा

Web Summary : ट्रम्प ने होर्मुज जलडमरूमध्य को फिर से खोलने में मदद करने से इनकार करने के लिए नाटो की आलोचना की, तेल की बढ़ती कीमतों के लिए उन्हें दोषी ठहराया। उन्होंने उन्हें डरपोक कहा और ईरान संघर्ष के बीच उनकी निष्क्रियता को याद रखने की कसम खाई।

Web Title : Trump Blasts NATO over Hormuz Strait Inaction, Calls Them Cowards

Web Summary : Trump criticizes NATO for refusing to help reopen the Hormuz Strait, blaming them for rising oil prices. He calls them cowards and vows to remember their inaction amid the Iran conflict.