Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:10 PM2020-03-28T13:10:21+5:302020-03-28T13:10:29+5:30

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.  

Coronavirus: Well Ahead india ... Former Norwegian Minister of Environment praises India's planning Erik Solheim on twitter | Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक

Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, मोदींनी देशहितासाठी आणि नागरिकांसाठी हे मोठं पाऊल उचललं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन जोमाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर पोलीस आहेत, तर रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी दिसतात. सर्वच  राज्यांचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री सातत्याने बैठका घेत आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. जागतिक पातळीवर पर्यावरणाशी संबंधित संस्थेत काम करणारे, युरोपातील नॉर्वे या देशाचे राजकीय नेते ईरिक सोल्हेम यांनी भारताने हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केलंय. 

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. भारतात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ८७९ वर गेली आहे. तर आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच, भारताने कोरोनासंबंधी घेतलेल्या निर्णयाचं परदेशातूनही कौतुक होतंय. 

नोर्वे देशाचे माजी पर्यावरण मंत्री आणि एका पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक संघटनेशी जोडलेले पर्यावरण प्रेमी ईरीक सोल्हेम यांनी भारत देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचं कौतुक केलंय. जगातील इतर प्रगत देशांच्या तुलतने भारताने कोरोनाशी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा सुरु केल्याचं सोल्हेम यांनी म्हटलंय. भारतात २१ दिवसांचा लॉक डाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये १.३ मिलियन्स म्हणजेच १३० कोटी नागरिक आपल्या घरात बसून आहेत. भारताचे लॉकडाऊन हे जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन असून देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही जगातील १/५ लोकसंख्या आहे, असेही  सोल्हेम यांनी सांगितलंय. ईरिक सोल्हेम यांना महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ट्विटरवर फॉलो करतात. 

चीनमधील वुहान शहरात ११ जानेवारी रोजी कोरोनाग्रस्त रुग्णाचा पहिला मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या एक असतानाच, १७ जानेवारी रोजी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने चीनमधून भारतात येणाऱ्या सर्वच विदेशी प्रवशांचे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील विमानतळावर स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाने विदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोरोनासंदर्भात काही सल्ला आणि सूचना देणारे पत्रक जारी केले.  २१ जानेवारी रोजी भारतात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या रुग्णांची संख्या ३ होती. तेव्हापासून भारताने अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोनाच लढा उभारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  २४ मार्च रोजी देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने घेतलेला हा निर्णय मोठं पाऊल ठरला आहे. भारत सराकरच्या या निर्णयाचे सोल्हेम यांनी कौतुक केलंय. 

Web Title: Coronavirus: Well Ahead india ... Former Norwegian Minister of Environment praises India's planning Erik Solheim on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.