शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्याविरोधात डॉक्टरांना मोठं यश; दोन औषधं ठरताहेत रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:17 PM

अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातलेलं असतानाचही तिकडच्या डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे.

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ३४ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात ७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. अमेरिकेतही कोरोनानं थैमान घातलेलं असतानाचही तिकडच्या डॉक्टरांना मोठं यश मिळालं आहे. अमेरिकेच्या डॉक्टरांना या व्हायरसशी लढण्यासाठी दोन औषधं सापडली आहेत. त्या दोन्ही औषधांचं मिश्रण करून कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यानंतर त्याच्यावर चांगला परिमाण दिसून येत आहे. एका आर्टिकलमध्ये अमेरिकेच्या डॉक्टरांनी हे दावे केले आहेत.  अमेरिकेच्या कॅन्सस सिटी शहरात डॉक्टर जेफ कॉलियर यांनी कोरोनावर थोडे संशोधन केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, डायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) आणि एझिथ्रोमायसिन (azithromycin) या औषधांच्या मिश्रणाचा रुग्णांवर परिणाम चांगला दिसून येतो. वॉशिंग्टन पोस्टमध्ये छापण्यात आलेल्या लेखात त्याचा उल्लेख केला आहे. ही औषधे प्रयोगशाळेत आणि रुग्णांमध्ये दोन्ही ठिकाणी वापरली गेली आहेत आणि दोन्ही ठिकाणांहून चांगले निकाल समोर आले आहेत. या दोन्ही औषधाच्या मिश्रणाचा कोरोनाबाधित रुग्णावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. मी व इतर डॉक्टरांनी मिळून या औषधांनी कोरोनाबाधित रुग्णांचा इलाज केल्यानंतर सकारात्मक चित्र दिसत आहे. कोरोनावर औषध सापडल्याचा फ्रान्सचा दावाफ्रान्सनेसुद्धा कोरोना विषाणूवर नवीन औषध सापडल्याचा दावा केला आहे. प्रारंभिक टप्प्यांतील रुग्णांवर हे औषध सकारात्मक परिमाण करत असून, रुग्णाला गंभीर स्थितीत पोहोचण्यापासून हे औषध प्रतिबंधित करते. फ्रान्सच्या इन्स्टिट्यूट हॉस्पिटलो युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ संशोधक, प्राध्यापक डिडायर राऊ यांनी नवीन औषधाची चाचणी यशस्वीरीत्या घेतल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.सरकारने वैज्ञानिकावर सोपवली जबाबदारी फ्रान्स सरकारने कोरोनाच्या संभाव्य उपचारांवर काम करण्याची संशोधक, प्राध्यापक डिडायर राऊ यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. त्यांनी प्रथम संक्रमित व्यक्तीला क्लोरोक्विनचे डोस दिले. यामुळे त्या रुग्णाच्या प्रकृतीत खूप प्रभावी सुधारणा झाली. हे औषध सामान्यत: मलेरियाच्या प्रतिबंध आणि उपचारात वापरले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याAmericaअमेरिका