शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

CoronaVirus News: कृत्याची शरम वाटली पाहिजे, चीनवरून डोनाल्ड ट्रम्प यांचं WHOवर तोंडसुख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:47 AM

तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे.

वॉशिंग्टन : चीनची जनसंपर्क संस्था (पीआर एजन्सी) असल्यासारखे वागणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला या कृत्याची शरम वाटली पाहिजे, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका दरवर्षी ५० कोटी डॉलर तर चीन फक्त ३८ लाख डॉलरचा निधी देते. या गोष्टीचा डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे उल्लेख केला होता. कोरोना साथीच्या काळात चीनला झुकते माप देणारी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. तसेच या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधीही ट्रम्प यांनी रोखला आहे.आपल्या निर्णयाचे समर्थन करताना ट्रम्प यांनी सांगितले की, एखाद्याने भयंकर चूक केल्यास त्याला पाठीशी घालणे योग्य नाही. चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली.चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा आरोप काही देशातील शास्त्रज्ञांनी केला होता. चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी सांगितले होते.>अमेरिका नाराजडोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने तटस्थ भूमिका घेऊन कोरोना साथीच्या स्थितीकडे पाहायला हवे होते. चीनकडून किती मोठी चूक झाली आहे हे जाणवूनही या संघटनेने त्या देशाला खडसावले नाही. ही गोष्ट अमेरिकेला खटकली आहे. आम्ही खूप नाराज आहोत असेही ट्रम्प यांनी सांगितले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना